दिंडोरी : गेल्या दहा वर्षात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे. आपण भारत देशाला आपण भारत माता म्हणतो. परंतु या देशात महिलांना सन्मानाने वागणुक मिळत नाही, महिलांवर अत्याचार होत आहेत. त्या सुरक्षित नाहीत, हे आपले दुर्दैव आहे. म्हणुन मतदानातून हे दडपशाहीचे सरकार घालवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांनी पिंपळगाव बसवंत येथे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचार सभेत उपस्थित मतदारांना केले.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी-इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार भास्कर भगरे सर यांच्या प्रचाराची सांगता करणारी विजय संकल्प सभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपळगाव बसवंत येथे संपन्न झाली. यावेळी सभेस उपस्थितांना संबोधित करताना रोहिणीताई खडसे म्हणाल्या की, ही आपल्या प्रचाराची सांगता सभा आहे. येत्या 20 तारखेला आपल्यातील असलेले, अनेक पदे भूषवून जमिनीवर असलेले भास्कर भगरे सरांना मतदान करायचे आहे. तुमच्या सर्वांमधील उत्साह बघून मला विश्वास आहे तुम्ही स्वतः घराबाहेर पडून भास्कर भगरे सरांना प्रचंड बहुमताने निवडून आणाल. सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे देशासमोर बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे महिलांचे प्रश्न बिकट बनले आहेत. गेल्या दहा वर्षात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे, हे आकडेवारी वरून लक्षात येते. या घटनांमुळे महिलामध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे.
आपल्या शेजारी असलेल्या धुळे जिल्हयात सत्ताधारी भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. आपल्यावर झालेल्या अत्याचाराची हि पिडीता पोलिस स्थानकात तक्रार करायला गेली तेव्हा भाजपा पदाधिकाऱ्यांच्या दबावापोटी तिची तक्रार घेतली गेली नाही. तिला न्याय मागायला न्यायालयात जावे लागले. न्यायालयाने त्या नराधम भाजपा पदाधिकाऱ्यावर पोस्को कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. भाजपा पदाधिकाऱ्यांची एवढी मुजोरी वाढली आहे की, एक अल्पवयीन पिडीता तिच्यावर झालेल्या अत्याचारा विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न करते, पण तिचा आवाज दाबला जातो. भाजप पदाधिकाऱ्यांच्या दबावापोटी पोलीस स्थानकात तक्रार घेतली जात नाही. तिला न्यायालयात न्याय मागावा लागतो. भाजपावाल्यांची हि मुजोरी दादागिरी का सहन करायची?. आता हि मुजोरी नष्ट करायची तुमच्या हातात आहे आणि या मुजोरीवर 20 तारखेला मतदानातून उत्तर द्यायचे आहे.
एक महिला म्हणुन मला तुमच्या सर्वांकडून एक अपेक्षा आहे की, तुम्ही आमच्या महिलांच्या पाठीशी उभे राहावे. कारण आम्हाला महाराष्ट्रात एक सुरक्षित वातावरण हवे आहे तो आमचा अधिकार आहे. आज आपण भारत माता की जय म्हणतो एक महिला म्हणून सर्व माता भगिनीना सन्मानाची वागणूक या भारत देशात अपेक्षित आहे. या देशात मणिपूर सारख्या घटना घडतात महिलांना निर्वस्त्र करून त्यांची धिंड काढली जाते. तिथे दोन महिने कर्फ्यु लागतो. पण या देशाच्या पंतप्रधानांना तिथे जायला दोन मिनिटे वेळ नाही हि शरमेची बाब आहे. भारत देशातआपण देशाला भारत माता म्हणतो परंतु इथे महिलांना सन्मानाने वागणूक मिळत नाही. त्यांच्यावर अत्याचार होत आहेत हे आपले दुर्दैव आहे.
धुळे, माणिपूर सारख्या महिलांवर अत्याचाराच्या असंख्य घटना गेल्या दहा वर्षात देशात झाल्या. त्याविरोधात आम्ही माता भगिनी आवाज उठवतो पण आमचा आवाज कोणी ऐकुन घेत नाही. म्हणून तुम्हा सर्वांना विनंती करते कि येत्या विस तारखेला सर्व माता भगिनींसाठी मतदान करायचे आहे. मतदान करून हे दडपशाहीचे सरकार घालवायचे आहे. तुम्हा सर्वांना वाटत असेल तुमच्या घरातील माता भगिनी कामानिमित्त घराबाहेर पडतात त्यांनी सुरक्षित राहायला हवे आणि सुरक्षित वातावरणात त्यांनी घरी परत यायला हवे तर हे भारतीय जनता पक्षाचे निर्लज्ज सरकार आपल्याला मतदानातून घालवायला हवे, मला अपेक्षा आहे तुम्ही ते कराल. आज आपण प्रत्येक जण महागाईने त्रस्त आहेत. विशेषतः माता भगिनी महागाईने जास्त त्रस्त आहेत. पुर्वी चारशे रुपयांचे मिळणारे गॅस सिलेंडर आता बाराशे रुपयांचे मिळते त्यामुळे गॅस सिलेंडर भरणे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेले आहे.
मोठं मोठ्या जाहिराती केलेली उज्वला गॅस योजना फसवी आहे. आधी भाजप वाले म्हणायचे ‘बहुत हुई महंगाई की मार अबकी बार मोदी सरकार’ त्यांना सत्ता जनतेने सत्ता दिली. पण गेल्या दहा वर्षात महागाई कमी झाली नाही. म्हणून आता आपण म्हणायचे ‘अबकी बार मोदीजी भाजप को करो तडीपार’ आणि मतदानातून त्यांना तडीपार केल्याशिवाय थांबायचे नाही. त्यासाठी येत्या २० तारखेला आपला मतदानरुपी आशिर्वाद भास्कर भगरे सरांना देऊन त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणा, असे उपस्थितांना आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर खासदार अमोल कोल्हे, उमेदवार ,भास्कर भगरे सर,माजी आमदार अनिल कदम, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब भाई शेख,युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर,जिल्हा पक्ष निरीक्षक तिलोत्तमाताई पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष संगीताताई पाटील, नितेश कराळे सर आणि महाविकास आघाडी- इंडिया आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.