पुणे(वृत्तसंस्था) पुणे शहरातील एका भागात राहणाऱ्या एका शेजारी नराधमाने अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून अपहरण करून मुंबईला ठेवल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर आरोपीला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे.
पुण्यात पुण्यातील गुलटेकडी परिसरात शेजाऱ्याकडूनच एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर आरोपीने पीडितेचे अपहरण करून मुंबईला ठेवल्याचीही बाब उघड झाली असून पोलिसांना नराधमाला अटक करत त्याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने १५ वर्षाच्या मुलीला धमकावत वारंवार बलात्कार केला आहे. ही बाब जेव्हा मुलीच्या वडिलांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली होती. या घटनेने गुलटेकडी परिसरात खळबळ उडाली असून सदर आरोपीने पीडितेच्या वडिलांना देखील धमकावल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीने पीडितेचे अपहरण करून मुंबईला नेले आणि तिथेही तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचं उघड झाल्यानंतर पीडितेने ही बाब पालकांच्या लक्षात आणून दिली होती. आता आरोपीला अटक करण्यात आली असून अधिकचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.