धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील ग्रामपंचायतचे नव्याने आरक्षण होऊन ७५ ग्रामपंचायती मध्ये ३९ ग्रामपंचायतीवर महिला आरक्षण राहणार आहे यात प्रामुख्याने डॉक्टर हेडगेवार ग्रामपंचायत पुन्हा अनुसूचित जाती जमाती आरक्षण जाहीर करण्यात आले. मागच्या पंचवार्षिकला सुध्दा एसटी आरक्षण निघाले होते त्यामुळे अनेक इच्छुकांचे स्वप्न भंग झाले. एकूण ७५ ग्रामपंचायती पैकी ५ ग्रामपंचायत अनुसूचित ११ ग्रामपंचायत अनुसूचित जमाती २० ग्रामपंचायत नागरिकांच्या मागास प्रवर्ग ओबीसी ३९ ग्रामपंचायती सर्वसाधारण जनरल असे आरक्षण जाहीर केले.
यापैकी ३९ ग्रामपंचायतीवर महिला राज राहणार आहे. ज्या मतदारांचे अद्याप आवेदनातून नाव नोंदणी झाली नसेल त्यांना २२ जुलै पर्यंत नाव नोंदण्याची संधी आहे. आपले ओरिजनल आधार कार्ड, रहिवासी दाखला हे दोनच कागदपत्रे आपल्याला द्यावे लागतील. ज्या महिला लग्न करून सासरी आल्या असतील त्यांनी आपला माहेरला आपले नाव कमी करून आपल्या पतीकडे राहत असलेल्या ठिकाणी नाव नोंदता येईल ७ नंबरचा फॉर्म भरून तो बीएलओ कडे द्यावा. मतदारांना काहीही अडचण असल्यास तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी केले आहे.
७५ ग्रामपंचायतीचे आरक्षण
आरक्षणासंदर्भात माहिती देण्यासाठी प्रांताधिकारी मनीष गायकवाड, गणेश पवार, नायब तहसीलदार सातपुते उपस्थित होते. ७५ ग्रामपंचायतीचे आरक्षण याप्रमाणे अनुसूचित जातीसाठी : १. डॉक्टर हेडगेवार नगर २. हिंगोणे बु ३. अनोरे ४. बोरखेडा ५. पथराड बु., अनु जाती महिला : १अनोरे २. बोरखेडा ३. पथराड बु., अनुसूचित जमातीसाठी : १. धानोरा २. पाळधी बु ३. खामखेडा ४. चोरगाव ५. निमखेडा ६. सतखेडा ७. हनुमंत खेडा / खु ८. फुलपाट ९. भामर्डी १०. वाकटूकी ११. निंभोरा- दहिदुले.
अनुसूचित जमाती महिलांसाठी : १. धानोरा २. पाळधी बु ३. खामखेडा ४. हनुमंत खेडा ५. भामर्डी ६. वाकटूकी., नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी: १. स्पष्टाणे बु २. बांभोरी प्रचा ३. भोद बु ४ लाडली ५. अहिरे बु-अहिरे खू ६. गंगापुरी ७. आव्हाणी ८. टहाकळी खू ९. मुसळी बु. मुसळी खु १०. हिंगोणे ११. पिंपळे बु. पिंपळे खु १२. वराड बु १३. नादेड १४. कंडारी बु १५. साकरे १६. कवठळ १७. चावलखेडा १८. भोद बु.-शाम खेडा १९. गारखेडा-बाभळ बु २०. निशाणे बु/खु.,
मागास प्रवर्ग महिलांकरिता : १. अहिरे बु.-अहिरे खु २. गंगापुरी बु ३. बांभोरी प्रचा ४. आव्हाणी ५. भोद बु ६. हिंगोणे खु ७. वराड बु ८. साकरे ९. कवठळ १०. चावलखेडा., सर्वसाधारणसाठी : १. नारणे २. बाभुळगाव ३. चमगाव ४. खर्दे बु ५. उखळवाडी ६. पष्टाणे खू ७. तरडे खू ८. सोनवद खू ९. चांदसर बु १०. अंजन विहीर ११. सोनवद बु १२. धार १३. शेरी १४. पाळधी खु १५. रेल १६. पथराड १७. दोनगाव बु १८. दोनगाव खु १९. झुरखेडा २०. एक लग्न बु २१. पोखरी २२. वराड खु २३. वंजारी बु-खपाट २४. चिंचपुरे बु २५. पिंपळे सिम २६. पिंपरी खु २७. भोद ख २८. कल्याणे खु २९. कल्याणे होळ-कल्याणे बु ३०. वाघळूद बु ३१. वाघळूद खु ३२. भवरखेडा-विवरे ३३. बोरगाव बु ३४. बोरगाव खु ३५. जांभोरा-सर्वे खु ३६. बिलखेडा ३७. बांभोरी बु ३८. साळवा ३९. गदिगाव.
सर्वसाधारण महिला १. एक लग्न बु २. झुरखेडा ३. तरडे खू ४. बिलखेडा ५.धार ६. दोणगाव बु ७. सोनवद बु ८. पष्टाणे खु ९. जांभोरा-सार्वे खू १०. कल्याणे खू ११. पाळधी खु १२. वाघडूद खु १३. सोनवड खु १४. भवरखेडा-विवरे १५. बांभोरी बु १६. पिंपळे सिम १७. चमगाव १८. उखळवाडी १९. भोद खु २०. अंजनविहिरे.