जळगाव (प्रतिनिधी) अयोध्यातील राम मंदिर निर्माण कार्यात सर्वाचा सहभाग असावा, तसेच अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य श्री राम मंदिरात सामान्य नागरिकांचाही हातभार लागावा, यासाठी निधी संकलन करण्यात येत असल्याने देशभरात पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये जळगाव जिल्ह्याने येण्याचा संकल्प, करण्याचे आव्हान उद्योजक अशोक जैन यांनी केले आहे.
जळगाव जिल्ह्यातून निधी संकलनाचा शुभारंभ नुकताच जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते झाला. यावेळी अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य श्रीराम मंदिरात सर्वसामान्य नागरिकांचे हातभार लागावा या हेतूने निधी संकलनास प्रारंभ करण्यात आला आहे. दरम्यान, निधी संकलनाकरिता श्रीराम मंदिर निधी समर्पण समितीची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी जळगाव पीपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, जिल्हा संचालक डॉ. निलेश पाटील, देवेंद्र भावसार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी आयोजकांनी डिजिटल स्क्रीन द्वारे अयोध्येतील श्रीराम मंदिराचा आराखडा व मंदिराच्या उभारणीची माहिती दिली. तसेच जिल्हाभरात प्रत्येक गावातून निधी संकलनासाठी येत्या रविवारपासून सुरुवात होणार असून, प्रत्येक गावात संकलनासाठी समिती नेमणार आहे. रुपये शंभर पासून ते १००० पर्यंत निधी देणगी देणार यांना पावती देणार असल्याचे सांगितले.