TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुरक्षित प्रवासासाठी वाहतुकीचे नियम पाळण्याचा संकल्प करावा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

The Clear News Desk by The Clear News Desk
January 18, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आपली व आपल्या कुटूंबाच्या सुरक्षेसह सुरक्षित प्रवासाकरीता प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळण्याचा संकल्प करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज केले.

येथील जिल्हा नियोजन भवनात ३२ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राऊत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, एसटी महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक माधव देवधर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे प्रमुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, रस्ते अपघातात एका व्यक्तीच्या चुकीची शिक्षा अनेकांनी भोगावी लागते. रस्ते अपघातात झालेल्या मृत्युपैकी ८० टक्के मृत्यु हे दुचाकी चालकांचे असून यात तरुणांची संख्या अधिक आहे. महामार्गावर हेल्मेटचा वापर न करणे, अतिवेगाने वाहने चालविणे ही यामागची प्रामुख्याने कारणे आहे. याकरीता वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत शाळा व महाविद्यालय पातळीवर अधिकाधिक जनजागृती होणे गरजेचे आहे. पालकांनी आपल्या मुलांना दुचाकी घेवून देतांनाच त्यांचेकडून हेल्मेट वापराचा संकल्प पाळण्याचे आश्वासन घ्यावे. त्याचबरोबर रस्ते बनविणारी व दुरुस्त करणाऱ्या यंत्रणांनी आपले रस्ते अधिकाधिक चांगले राहण्यासाठी प्रयत्नशील रहावे. जिल्ह्यात रस्त्यांचे चांगले जाळे असेल तर त्या जिल्ह्याचा अधिक विकास होतो असेही त्यांनी सांगितले. वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करतांना दुचाकी चालकांनी हेल्मेटचा व चारचाकी वाहन चालकांनी सीटबेल्टचा वापर करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी राऊत यांनी केले.

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे म्हणाले की, सर्वात धोकेदायक बाब ही अपघात आहे. अनेक अपघात हे वेगाने वाहन चालविण्याने होतात. त्यामुळे वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करुनच प्रवास करावा. आपणास इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन प्रवास केल्यास घाई होत नाही. अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस, परिवहन व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे थ्री E चा वापर करण्यात येणार आहे. यात अपघाताला निमंत्रण देणाऱ्यांवर कारवाई करणे, (Enforcement) वाहतुकीचे नियोजन (Enginearing) आणि वाहतुक नियमांची प्रचार व प्रसिध्दी (Education) या बाबींचा अवलंब करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महापालिका आयुक्त कुलकर्णी म्हणाले की, वाहतुकीचे नियम हे आपल्या सुरक्षेसाठीच असल्याने प्रत्येकाने त्याचे पालन करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात १२ हजार २०० किलोमीटर लांबीचे रस्ते आहे. त्यापैकी ५ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतात या रस्त्यांवर अद्याप एकही अपघाती स्थळ (Blockspot) निश्चित झाले नसल्याचे प्रशांत सोनवणे यांनी सांगितले. तर अपघातग्रस्ताला पहिल्या अर्ध्या तासात (Golden Hours) उपचार मिळाले तर त्याचा जीव वाचू शकतो. त्यामुळे नागरीकांनी अपघातग्रस्त व्यक्तीला तातडीने दवाखान्यात नेले पाहिजे असे डॉ चव्हाण यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात रस्ता सुरक्षा अभियानाची संकल्पना सांगून श्याम लोही म्हणाले की, जिल्ह्यात महामार्गाचे काम सुरु असल्याने वाहनचालकांनी वाहनाची गती पाळावी. वाहतुकीचे नियम पाळतांना स्वयंशिस्त व आत्मपरिक्षण करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी रस्ता सुरक्षा पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच परिविक्षाधीन सहायक मोटार वाहन निरिक्षक नीलम सैनानी यांनी रस्ता सुरक्षेवरील गीत गायले तर परिवहन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रस्ता सुरक्षेबाबत पथनाट्यातून जनजागृती केली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. राजेंद्र देशमुख तर उपस्थितांचे आभार कर वसूली अधिकारी, चंद्रशेख इंगळे यांनी मानले. यावेळी शहरातील महिला रिक्षा चालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास मोटार वाहन निरिक्षक गणेश पाटील, श्रीकांत महाजन, विकास सुर्यवंशी, सुनिल गुरव, पोलीस निरिक्षक देविदास कुणगर, सहा. मोटार वाहन निरिक्षक पांडूरंग आव्हाड, दिपक साळुंखे यांचेसह उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतुक शाखा, महामार्ग पोलीस, एसटी महामंडळातील अधिकारी, कर्मचारी, मोटार ड्रायव्हिंग स्कुलचे संचालक, जिल्ह्यातील वाहन वितरक, विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
Next Post

ग्रामिण जनता भाजपाच्याच पाठीशी असल्याचे झाले सिद्ध : तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

९ हजारांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकाऱ्यासह एकास अटक !

September 9, 2023

Horoscope Today : आजचं राशीभविष्य – सोमवार, १७ जून २०२४ !

June 17, 2024

वधूच्या लग्नसोहळ्यात मौलाना स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाही ; तंझीम उलमा व आयम्माचा निर्णय !

March 15, 2021

Weekly-Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १४ ते २० मे !

May 14, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group