चाळीसगाव प्रतिनिधी – आज चाळीसगाव येथे नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुक 2025 मधे पराभूत उमेदवार यांची संयुक्त बैठक संपन्न झाली या बैठकीत निवडणुक मतदार राजांनी जो कौल दिला त्या अनुषंगाने त्याचा आदर करत प्रभागात नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत याच धर्तीवर प्रतिनगरसेवक ही कल्पना श्री दिलीप घोरपडे यांनी मांडली व प्रतिनगरपालीका कामकाज प्रशासनकडून कसे करायचे या दृष्टिकोनातून घृष्णेश्वर पाटील यांनी विचार मांडले यासाठी बैठक आयोजित करण्यात आली
नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीत मतदार बांधवांनी जो भाजपाच्या विरोधात बहुतांश मते आहेत हे लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला व यापुढे प्रत्येक प्रभागात प्रतिनगरसेवक हे तेवढ्याच ताकदीने काम करून नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील तसे प्रभागनिहाय प्रतिनगरसेवक यांची घोषणा लवकरच करण्यात येईल असा अपस्थित यांच्यावतीने ठराव करण्यात आला व महाराष्ट्रात चाळीसगाव शहरातून नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आदर्श निर्माण करण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला या बैठकीस खालील सदस्य उपस्थित होते
घृष्णेश्वर पाटील,महेंद्र पाटील,चंद्रकांत तायडे,संजय चौधरी,दिलीप घोरपडे,भुषण ब्राम्हणकार, अमोल नानकर, नितीन देशमुख,आनंदा पवार सर,दुर्गश जाधव,प्रशांत पाटील,सचिन आव्हाड, योगेश राजधर पाटील,सागर मधुकर पाटील,सौरभ पाटील, गोपाल भालेराव, बबनभाऊ पवार,लेवेश राजपूत, चिरागद्दीन शेख, सुनिल काशिनाथ गायकवाड, गणेश महाले आदी उपस्थित होते.














