यावल (प्रतिनिधी) नियमितपणे आरोग्याची तपासणी करून घरी परताना बसमध्येच हृदयविकाराने मृत्यू सेवानिवृत्त नायब तहसीलदाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. १५ सप्टेंबर रोजी घडली. वसंत गणपत पाटील (वय ८६ रा. महाजन गल्ली), असे मृताचे नाव आहे,
येथील महाजन गल्लीतील रहिवासी सेवानिवृत्त नायब तहसीलदार वसंत पाटील यांचा बस प्रवासात हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. महाजन नियमितपणे आपल्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी जात असे. दि. १५ सप्टेंबर रोजी यावलकडे येत असताना त्यांचा एसटी बसमध्येच प्रवासादरम्यान मृत्यू झाला.
वसंत पाटील हे जळगाव येथे डोळ्यांच्या तपासणीसाठी गेले असता ते परतीच्या मार्गावर जळगावहून यावलकडे येणाऱ्या एसटी बसने आपल्या गावी यावल येत असताना वाटेतच गिरडगाव जवळ त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते बेशुद्ध पडले, अशी माहिती एसटी कर्मचाऱ्यांनी दिली. गिरडगाव जवळ त्यांना हृदयविकाराच्या झटका आल्याने ते बेशुद्ध पडले. बेशुद्धावस्थेत त्यांना यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर चौधरी यांनी घोषित केले.