जळगाव(प्रतिनिधी) : मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना तत्काळ बडतर्फ करून अटक करावी तसेच हे प्रकरण चव्हाट्यावर आणणारे सहायक फौजदार अशोक महाजन यांचे निलंबन मागे घेऊन सेवेत सामावून घ्यावे, अशी एकमुखी मागणी मराठा समाजाने शनिवारी पोलीस अधीक्षकांकडे केली. मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, छावा संघटना, बुलंद छावा संघटना, मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज अशा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची भेट घेतली. या प्रकरणात पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यासाठी आलेले मराठा समाजाचे पदाधिकारी व कार्यकतें. अशोक महाजन यांचा काहीही दोष नसताना त्यांना निलंबित करण्यात आले असून, हा त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, त्यांना पूर्ववत सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी वजा विनंती करण्यात आली.
यावेळी राम पवार, विनोद देशमुख, प्रा.डी डी बछाव, हिरामण चव्हाण, भीमराव मराठे, दिनेश कदम, रवी देशमुख, गिरीश पाटील, चंद्रकांत देसले, सुरेंद्र पाटील, सुचिता पाटील, मनीषा पाटील, शिवमती पवार, गितांजली देसाई, मिनल देवरे, भारती पवार, पूनम पाटील, माधवी ठाकरे, नंदू पाटील, शिवराम पाटील, संदीप पवार, संजय पाटील, रामचंद्र पाटील, अनिल पाटील, उमेश देवरे संतोष पाटील यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.