TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील उपसा सिंचन योजनांची आढावा बैठक संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
August 20, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील उपसा सिंचन योजनांची आढावा बैठक जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी दि. १२ ऑगस्ट रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांचेकडे मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील बोदवड परिसर उपसा सिंचन योजना, कुऱ्हा वढोदा इस्लामपुर उपसा सिंचन योजना, मुक्ताई उपसा सिंचन योजना, वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजना या अपुर्ण अवस्थेत असलेल्या उपसा सिंचन योजनांची आढावा बैठक घेऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली होती

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

त्यानुसार जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या मंत्रालय येथील दालनात आज दि. २० ऑगस्ट रोजी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील उपसा सिंचन योजनांची आढावा बैठक जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर, ता ना मुंडे सचिव जलसंपदा विभाग, विजय गौतम विशेष कार्य अधिकारी जलसंपदा मंत्री, अ प्र कोहीकर सचिव, डी डी तवार कार्यकारी संचालक तापी महामंडळ, वाय एम कडलग कार्यकारी अभियंता तापी महामंडळ, निवृत्ती पाटील सभापती बोदवड बाजार समिती, सुभाष पाटील माजी जि प सदस्य, रामभाऊ पाटील माफदा मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष, विशाल महाराज खोले जिल्हा संयोजक प्रवक्ता सेल जळगाव जिल्हा, रविंद्र पाटील उपसरपंच हिवरा हे उपस्थित होते तर जळगाव येथुन व्हिडीओ कॉन्फरस द्वारे प्रशांत मोरे अधीक्षक अभियंता, गोकुळ महाजन कार्यकारी अभियंता, अदिती कुलकर्णी कार्यकारी अभियंता हे उपस्थित होते.

पूर्णा तापी नदीचे पुराद्वारे वाहून जाणारे पाणी लिफ्ट इरगेशद्वारे उपसुन मुक्ताईनगर बोदवड कुऱ्हा परिसरातील शेतीला देऊन शेतीचे कोरडवाहू क्षेत्र बागायती खाली येण्यासाठी एकनाथ खडसे हे जलसंपदामंत्री असताना त्यांनी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात तापी खोरे विकास महामंडळाअंतर्गत बोदवड उपसा सिंचन योजना, कुऱ्हा वढोदा इस्लामपुर उपसा सिंचन योजना, मुक्ताई उपसा सिंचन योजना, वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजनाची मुहूर्तमेढ रोवली या योजनांचे काम सुरु आहे. या उपसा सिंचन योजनांच्या आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा आज जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी घेतला

यावेळी मुक्ताई उपसा सिंचन योजनेचे ८० टक्के काम पूर्ण झाले असुन उर्वरित कामासाठी आवश्यक असलेल्या ५५ कोटी रुपये निधीचा सुधारीत प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे गेलेला आहे. त्यावर जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी प्रस्तावावर तत्काळ निर्णय घेण्यात येईल व निधीची उपलब्धता करून देण्यात येईल असे सांगितले.

मुक्ताईनगर तालुक्यातील जोंधनखेडा गावाजवळ गोरक्षगंगा नदीवर असलेल्या कुंड धरणाचे काम पूर्ण झाले आहे परंतु, धरणाच्या भिंतीची उंची वाढविणे व सांडव्याचे काही काम अपूर्ण राहिले आहे. यावर धरणाच्या भिंतीची ३ मीटर ने उंची वाढविणे व सांडव्याचे अपूर्ण असलेले काम पूर्ण करण्यासाठी सुमारे १९ कोटी रुपये निधीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात येईल, असे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी सांगितले. वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजनेचे काम जवळपास पुर्ण झाले आहे त्याद्वारे हतनुरचे वाहून जाणारे पाणी ओझरखेडा धरणात टाकण्यात येते परंतु हि योजना काही तांत्रिक अडचणीमुळे बंद अवस्थेत आहे. त्यामुळे योजनेच्या विद्युत पुरवठा व पाणी उपसा करणारे पंपामध्ये बिघाड निर्माण झाला आहे.

त्यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी संबंधित अधिकारी यांना पावसाळ्यापूर्वी दरवर्षी योजनेची तांत्रिक चाचणी घेण्यात यावी, असे सक्त निर्देश दिले व आता लवकरात लवकर विद्युत पुरवठ्याचे व पंपाचे काम करून ओझरखेडा तलावात पाणी सोडण्याचे आदेश दिले तसेच या योजनेचे अपूर्ण असलेले पाणी वितरिकेचे काम करण्यासाठी प्रस्तावाला मंजुरी देण्यात येईल व वितरिकेच्या कामांची निविदा काढण्यात येईल असे सांगितले.

बोदवड परिसरासाठी वरदान ठरणाऱ्या बोदवड उपसा सिंचन योजनेच्या आतापर्यंत झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. बोदवड उपसा सिंचन योजनेसाठी केंद्र शासनाच्या मार्फत ५०० कोटी मंजूर झाले आहेत. यातील ६० कोटी रुपये निधी मिळाला असुन उर्वरित ४३३ कोटी रुपये निधी मिळण्यासाठी संबंधित अधिकारी यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी दिले. कुऱ्हा वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेचे अपुर्ण असलेल्या कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी अहवाल सादर करण्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी संबंधित अधिकारी वर्गाला निर्देश दिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळले अवघे २ कोरोनाबाधित, ४ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ठाकरे गटाचे नेते गजानन मालपुरे यांच्या हद्दपारीचे आदेश रद्द !

July 31, 2024

कृषी मंत्री अनिल बोंडेच्या ‘त्या’ पोस्टवरुन युजर्सचा संताप

November 17, 2021

बापरे..लग्नाच्या ५ व्या दिवशीच नवऱ्याला सोडून चुलत भावासोबत पळाली नवरी !

February 12, 2022

अनेर धरणात २८ टक्के पाणीसाठा ; नदीच्या प्रवाहाने जोर धरला !

July 15, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group