नवी दिल्ली (वृत्तसंस्था) इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांचा नियोजित दौरा रद्द करावा. तसेच इंग्लंडच्या विमानांवर तातडीने बंदी घालावी. तिथून जे प्रवासी आले असतील त्यांना क्वारंटाइन केलं आहे अशी मागणी आता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार समोर आला आहे. हा नवा प्रकार नियंत्रणाबाहेर असल्याचा इशारा देण्यात आल्यानंतर युरोपियन युनियनच्या अनेक राष्ट्रांनी तिथून येणाऱ्या उड्डाणांवर आणि सर्व विमान प्रवासावर बंदी घातली आहे. शिवाय रविवारपासूनच ब्रिटनमध्ये सक्तीचं लॉकडाऊनही लागू करण्यात आलं आहे. तिथली परिस्थिती हाताबाहेर गेली आहे असं खुद्द बोरीस जॉन्सन यांनीच सांगितलं आहे. अशा परिस्थितीत कोणतीही हयगय न करता तातडीने तिथल्या विमानांवर बंदी घालावी. तसंच बोरीस जॉन्सन यांना प्रजासत्ताक दिनी जे निमंत्रण दिलं आहे तेपण रद्द करावं असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे तिथे कोरोनाचा धोका वाढला आहे. लंडनमधून तर प्रत्येकजण बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आहे. कोरोना व्हायरसचा नवा प्रकार या ठिकाणी समोर आला आहे. लंडनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाउन सुरु केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बोरीस जॉन्सन यांचा दौरा रद्द करावा अशी मागणी केली आहे. आज याबाबत पंतप्रधान कार्यालयाची एक बैठक होणार आहे. मात्र यावर बैठक वगैरे न घेता तातडीने निर्णय घेण्यात यावा आणि इंग्लंडहून भारतात येणाऱ्या विमानांवर बंदी घालावी अशी आग्रही मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. इतकंच नाही तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवरही टीका केली आहे. त्यांनी लॉकडाउन करण्यासाठी उशीर केला त्यामुळेच महाराष्ट्रात करोना पसरला असंही पृथ्वीबाबांनी म्हटलं आहे.
भारताच्या यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे हे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन आहेत. परंतु ब्रिटनमध्येच कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्यानंतर बोरिस जॉनसन यांचा दौरा रद्द करावा, असं चव्हाणांनी सुचवलं आहे. ते म्हणाले की, “प्रजासत्ताक दिनाच्या जवळपास या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढला तर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा दौरा रद्द केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं जनतेचं आरोग्य आहे, त्याच्याशी तडजोड नको.”