धरणगाव(प्रतिनिधी) : येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित धरणगाव येथे नवरात्र उत्सवानिमित्त दिनांक 26.9. 2022 सोमवार पासून ते दिनांक 4.10.2022 मंगळवार पर्यंत प.पू.गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वाद व मार्गदर्शनानुसार संपुर्ण भारतातुन भारत मातेचा रक्षणार्थ अब्जचंडी अंतर्गत सामुदायिक पाठाचे आयोजन करण्यात आलेले आहे. पाठाची वेळ सकाळी 8.15 ते 10.00 तसेच दुपारी 4.00 ते 5.30 या वेळेत आहे. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी नजिकच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सामुदायिक श्री दुर्गा सप्तशती पाठास सहभाग घ्यावा.असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र धरणगाव तालुका प्रमुख राकेश मकवाने तसेच केंद्रप्रमुख आर.पी.पाटील यांनी केलेले आहे.