चाळीसगाव (प्रतिनिधी) रघुवीर व्यायाम प्रसारक मंडळ व कोंडाजी वस्ताद व्यायाम शाळा यांच्या वतीने गुढीपाडव्याच्या असतील. मुहूर्तावर अखंड वर्षाच्या परंपरेनुसार २२ रोजी दुपारी ३ वाजता अँग्लो उर्दू हायस्कूलच्या पटांगणावर कुस्त्यांचा सामना आयोजित करण्यात आला आहे.
आखाडा पूजन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी चेअरमन नारायणदास अग्रवाल व कुस्तीगीर संघाचे तालुकाध्यक्ष अक्षय अग्रवाल यांच्या हस्ते होणार आहे. तर मुख्य कुस्ती सामन्याचे उद्घाटन खासदार उन्मेष पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा कुस्तीगीर संघाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजीव देशमुख या कुस्ती सामान्यांसाठी आमंत्रित मल्लांसह जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नामवंत मल्ल उपस्थित राहणार आहेत.
भगवानदास अग्रवाल व शामभाऊ अग्रवाल यांच्या स्मरणार्थ अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्टतर्फे चषक व रोख इनाम देण्यात येणार आहे. कुस्तीचा लाभ कुस्तीप्रेमींसह नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रघुवीर व्यायाम शाळेचे अध्यक्ष अक्षय अग्रवाल, उपाध्यक्ष शे. गफूर शे. हजरत, सचिव रमेश जानराव, योगेश अग्रवाल व पदाधिकारी यांनी केले आहे.