भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील महामार्गाजवळ खडका चौफुली बोगदा खालील भुसावळ शहरात व खडका गावापर्यंत जाणाऱ्या मार्गावर रोडचे रुंदीकरण नॅशनल हायवे अथोरिटीने दिलेल्या आकृती नियमाप्रमाणेच करावे, अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे इलियास इक्बाल सेठ मेमन यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे इलियास इक्बाल सेठ मेमन यांनी दिलेल्या निवेदन म्हटले आहे की, एकाला न्याय व दुसऱ्यावर अन्याय का? भुसावळ शहरातील खडका चौफुलीच्या बोगदाच्या दोन्ही मार्ग मार्गावर रस्त्याचे काम परिसरातील नागरिकांनी काम बंद पाडले होते. महामार्गाजवळ खडका चौफुली नॅशनल हायवे ओव्हर ब्रिज बांधण्यात आलेले आहेत. त्या ओव्हरब्रिज बोगद्यातून भुसावळ शहर व खडका गावाकडे जोडणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला समान विभागणी करून रस्त्यावर येणाऱ्या एकाच बाजूलाच रस्ता मोजमाप करून दोन्ही बाजूला नागरिकांवर अन्याय होणार नाही, अशा तऱ्हेने मोजमाप करावे, अशी भूमिका घेत नागरिकांनी मंगळवार रोजी दिनांक ९-११-२०१९ रोजी तब्बल तीन तास गोंधळ घातला होता. शेवटी मुख्य अधिकारी व पीडब्ल्यूडी अधिकारी पोलिस प्रशासनाने उपस्थितीत दिली होती आणि प्रशासनाने मध्यस्थी केल्याने हा वाद थांबविण्यात आले होते. पुन्हा हा वाद निर्माण होऊ नये म्हणून माननीय मंत्री महोदय साहेब आपण याकडे जातीयने लक्ष घालून ज्या नियम अटी शर्तीने रोडचे काम सुरळीत परिपूर्णताह करण्यात यावे. भुसावळ शहरातील नॅशनल हायवे जात असलेलं खडका चौफुली वरून बोगद्यातून निघणार्या मार्गावरील खडका गावाकडे जाणाऱ्या मार्गाला असणारे रहिवासी सलमान सुलतान मेमन यांच्या मालकीची असलेली दोन मजली इमारत सर्वे नंबर 16/1/अ /2पैकी/12 /5 असा असून याची रीतसर ऐणे असून व बांधकाम परवानगी नुसार दोन मजली इमारत बनविण्यात आलेली आहे. तसेच सलमान मेमनच्या विरुद्ध बाजूने असलेली बिल्डींग ही रितसर परवानगीने आहे की नाही याबाबत चौकशी करून खडका रोड या मार्गावर सविस्तर रोड बनविण्यात यावे. तसेच खडका चौफुली ओवर ब्रिज बोगद्यात पासून भुसावळ शहराच्या मार्गावरही एन एच आय च्या दिलेल्या आकृती नुसार दोघं बाजूंचे दिलेल्या अटी व शर्ती आकृतीप्रमाणे बनविण्यात यावे, असे यात म्हटले आहे.
















