ग्वाल्हेर (वृत्तसंस्था) भाजप खासदार आणि ग्वाल्हेरमधील राजघराण्याचे वारसदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजमहालात दरोडा पडल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील जयविलास पॅलेसमध्ये चोरांनी रानी महलमधील रेकॉर्ड रूमवर हात साफ केला. कडक सुरक्षा असूनही चोर रेकॉर्ड रूममद्ये घुसले आणि तेथील कगदपत्रे खंगाळून काढली. चोरांनी एक पंखा आणि कप्यूटरचा सीपीयूही लांबवला.
भाजपा खासदार आणि ग्वालियरमधील राजघराण्याचे वारसदार ज्योतीरादित्य शिंदे यांच्या महालात दरोडा घालण्यात आल्याचं समोर आलं आहे. मध्य प्रदेशातील जयविलास पॅलेसमध्ये काही दरोडेखोर घुसले होते. स्थानिक पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून दरोडेखोरांनी महालामधील राणी महालमध्ये घुसखोरी केली आहे.
पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून फॉरेन्सिक टीमच्या मदतीने घटनास्थळावरुन पुरावे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. घटनास्थळी स्निफर डॉगही पाठवण्यात आले आहेत. दरम्यान महालात नेमके किती दरोडेखोर शिरले होते आणि काय सामान चोरी गेलं आहे याची माहिती अद्याप पोलीस घेत आहेत. ग्वालियरचे शहर पोलीस अधीक्षक रतनेश तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी बरंच नुकसान केलं आहे. पोलीस याप्रकरणी महालामधील कर्मचाऱ्यांचीदेखील चौकशी करत आहे.