जळगाव (प्रतिनिधी) रोटरी क्लब जळगाव इलाईटतर्फे २० दिवसीय मोफत बेसिक ब्युटीपार्लर प्रशिक्षण वर्गाचा प्रारंभ इंडिया गॅरेजजवळील इंडिया प्लाजामध्ये झाला. या प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ असिस्टंट डिस्ट्रीक्ट गर्व्हनर संगीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
हा उपक्रम महिला सबलीकरणासाठी राबविण्यात येत आहे. या वर्गात महिला प्रशिक्षण घेऊन त्या स्वत:चे पार्लर सुरू करू शकतात. या स्वयंरोजगारातून महिला आर्थिक स्वावलंबी होऊन त्या इतरांना देखील रोजगार उपलब्ध करुन देऊ शकतात, असे मत संगीता पाटील यांनी व्यक्त केले. लुकवेल ब्युटीपार्लरच्या संचालिका लीना झोपे यांनी महिलांना ब्युटीपार्लरची कला व व्यावसायिकतेविषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. वैजयंती पाध्ये यांनी केले. यावेळी क्लबचे सचिव संदीप असोदेकर, अजित महाजन, प्रोजेक्ट चेअरमन मनीषा पाटील, मनीषा खडके, समृद्धी रडे, कविता वाणी, बिना चौधरी, चारू इंगळे, काजल असोदेकर आदी उपस्थित होते. या उपक्रमासाठी क्लबचे अध्यक्ष नितीन इंगळे यांचे सहकार्य लाभले.