मुक्ताईनगर (प्रतिनिधी) माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याकडे शासकीय अल्पसंख्याक तंत्रनिकेतन मुक्ताईनगरसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले असून सुमारे ४ कोटी रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे. या मिळालेल्या निधीतून तंत्रनिकेतनच्या कार्यशाळा व प्रशासकीय इमारतीच्या कामाला गती मिळणार आहे.
एकनाथराव खडसे हे महसुल अल्पसंख्याक विकास मंत्री असताना त्यांनी अल्पसंख्याक समाजातील युवक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे, त्यांच्यातून कुशल तंत्रज्ञ निर्माण व्हावे, यासाठी मुक्ताईनगर येथे अल्पसंख्याक तंत्रनिकेतन मंजुर केले होते. सालबर्डी शिवारात त्याचे काम सुरू असुन तंत्रनिकेतनची इमारत पूर्णत्वास येत आहे. परंतु, कोरोना व इतर बाबींमुळे निधी मिळण्यास अडचण येत होती. ही बाब लक्षात घेऊन एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याकडे शासकीय अल्पसंख्याक तंत्रनिकेतन मुक्ताईनगर साठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला अनुसरून महाराष्ट्र शासन, अल्पसांख्याक विभाग, शासन निर्णय क्रमांक तंत्रनि-२०१६/प्र.क्र.८२/का.८ दि. ९ मार्च २०२१ नुसार सुमारे ४ कोटी रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे. यातून तंत्रनिकेतनच्या कार्यशाळा व प्रशासकीय इमारतीच्या कामाला गती मिळणार आहे.