धरणगाव (प्रतिनिधी) येथील एकशे आठ वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये आज फुले- शाहू – आंबेडकरी विचारांचे सत्यशोधकी अनुयायी आबा उपाख्य राजेंद्र जगन्नाथ वाघ यांची स्वराज्य बहुउद्देशीय संस्थेच्या माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक डॉ.संजीवकुमार सोनवणे यांच्या हस्ते राजेंद्र वाघ यांना शाल, परिवर्तनवादी ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपमुख्याध्यापक आर.के.सपकाळे, एनसीसी मेजर डी.एस.पाटील, विज्ञान शिक्षक सुरेंद्र सोनार यांची उपस्थिती होती. राजेंद्र वाघ यांनी शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.