अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील लोंढवे येथे जळगाव येथील मायमाती फाउंडेशनतर्फे आणि अमळनेर पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब जीवन पाटील यांच्या सहकार्याने दिनांक ५ जानेवारी रोजी स्व. एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालयात मोफत अभ्यासिका केंद्र सुरू करण्यात येत आहे. विद्यालयात सकाळी १०.३० वाजता हा उद्घाटन कार्यक्रम होणार आहे.
या अभ्यासिकेचे उद्घाटन जळगाव येथील दर्जी फाउंडेशनचे संचालक गोपाल दर्जी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, माजी आमदार स्मिताताई वाघ, तसेच अमळनेर येथील सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव देसरे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मायमाती फाउंडेशनचे संचालक सुहास पाटील आणि प्रभावती पाटील यांनी केले आहे.
अभ्यासिकेचा विद्यार्थ्यांना होणार फायदा
लोंढवे येथे स्व. एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालयात सुरू होणाऱ्या या मोफत अभ्यासिका केंद्रात विविध स्पर्धा परीक्षा व भरतीसाठी सर्व सुविधा युक्त अभ्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा देणे सुलभ होईन करीअर करता येणार आहे.