TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सचिन वाझे हे ओसामा बिन लादेन असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय, ते कशासाठी? : मुख्यमंत्री

The Clear News Desk by The Clear News Desk
March 10, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. मनसुख हिरेन आणि मोहन डेलकर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. आधी फाशी द्या आणि मग तपास करा, अशी तपासाची पद्धत नसते. कुणी तपासाला दिशा देऊ शकत नाही. एखाद्याला टार्गेट करायचं आणि त्याला आयुष्यातून उठवायचं अशी पद्धत सध्या सुरू आहे, असं सांगतानाच सचिन वाझे हे ओसामा बिन लादेनच आहेत, अशा पद्धतीने चित्रं तयार केलं जात आहे. ते कशासाठी?, असा सवालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केला आहे.

आज विधानसभेत मनसुख हिरण प्रकरणावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं. अधिवेशन संपल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, अनिल परबही उपस्थित होते. तसेच अधिवेशनात मनसुख हिरण प्रकरण खूप गाजलं होतं. अशातच हिरण प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला असून क्राईम ब्रांचचे अधिकारी सचिन वाझे यांची बदली करण्यात आल्याची घोषणाही गृहमंत्र्यांनी केली आहे. “सर्वांची गैरसोय झालेली आहे. आज विधीमंडळाचं अधिवेशन समाप्त झालं, कोरोनामुळे आव्हानात्मक होतं. पण कोरोनाचे नियम पाळून सर्वांनी सहकार्य केलं. त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्या अर्थसंकल्पावर आज चर्चा झालेली आहे. हा अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर हे अधिवेशन समाप्त करण्यात आलं असून पुढच्या अधिवेशनाची घोषणाही करण्यात आली आहे. एकूणच गेले १० दिवस जे काही झालं, त्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहात.” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

“महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं अधिवेशन संपलं असून कोरोनाच्या संकटात हे अधिवेशन व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य केलं. विरोधी पक्षानेही उत्तम सहकार्य केलं. यापूर्वी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आम्ही तुमच्याशी संवाद साधला होता. आताच्या आवाहनात्मक परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प यावेळी सादर करण्यात आला. महाराष्ट्र कधी थांबला नाही, कधी थांबणार नाही.” , असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

सचिन वाझे यांचा सध्या शिवसेनेशी कोणताही संबंध नाही : मुख्यमंत्री

मनसुख हिरण प्रकरणी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “आत्महत्या, मृत्यू झाल्यावर दखल घेण्याचं काम सरकारचं आहे. मोहन डेलकर यांनी आत्महत्या करताना लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये नावं आहेत. जिलेटीन कांड्या सापडल्याचा तपास सुरु आहे. आधी फाशी द्या मग तपास करा याला अर्थ नाही. ही सरकारची पद्धत नाही. अजून एक नवीन पद्धत आहे, टार्गेट करायचं आणि चारित्र्यहनन करायचं, हे आम्ही नाही करणार. एवढं झाल्यावरही मनसुख हिरण यांच्या मृत्यूची दखल आम्ही घेतली. सचिन वाझे म्हणजे, ओसामा बिन लादेन असं चित्र निर्माण केलं जातं आहे. पण जो सापडेल त्याला दया माया दाखवणार नाही.” पुढे बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “मनसुख हिरण मृत्यूप्रकरण गांभीर्याने घेतलेलं आहे, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणार; तर सचिन वाझे यांचा सध्या शिवसेनेशी कोणताही संबंध नाही.”

मग पोलीस यंत्रणा रद्द करा

हिरने यांच्या मृत्यूची गांभीर्याने दखल घेतली आहे. सचिन वाझे जणू ओसामा बिन लादेनच आहेत, असं चित्रं कशासाठी निर्माण केलं जात आहे. आम्ही कुणालाही दयामाया दाखवणार नाही. कोणईही असेल त्याला शिक्षा होणारच, असं सांगतानाच चौकशी करून फाशी द्या ही आपल्याकडची न्यायाची पद्धत आहे. फाशी देऊन न्याय करा अशी पद्धत नसते. त्यांनी जर पद्धत बदलली असेल तर त्यांनी सांगावं, असा टोलाही त्यांनी लगावला. प्रत्येक गोष्टीसाठी यंत्रणा असते. एखादा गुन्हा किंवा घटना किंवा दुर्घटना घडली असेल त्याबाबत शंका असेल तर आपल्याकडे अनेक यंत्रणा आहेत. जर यांच्या यंत्रणा भारी असतील तर पोलीस यंत्रणा रद्द करायची का?, असा सवाल त्यांनी केला. यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. अर्णव गोस्वामींना अटक केली म्हणून वाझेंना अडकवताय का?, असा सवालही त्यांनी केला.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

अहमदनगरमध्ये द्राक्षाने भरलेला टेम्पो बस स्थानकात घुसला, अपघातात एक जण ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अॅड. वसंतराव भोलाने यांचा भाजपतर्फे सत्कार !

August 15, 2023

मोदीजी, भारताचा नंबर कधी येणार? लसीकरणाबाबत राहुल गांधींचा सवाल

December 23, 2020

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, १३ नोव्हेंबर २०२४ !

November 13, 2024

जळगाव जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनांच्या पूर्णत्वासाठी निधी उपलब्ध करून द्यावा : ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर

August 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group