चाळीसगाव (प्रतिनिधी) सह्याद्री प्रतिष्ठान या दुर्ग संवर्धन करणाऱ्या संघटनेमार्फत दरवर्षी दि. १६ डिसेंबर व दि. २६ जुलै रोजी अनुक्रमे भारताचा पाकिस्तानवर विजय दिवस व कारगिल विजय दिवस या निमित्ताने ‘शौर्य तुला वंदितो’ या कार्यक्रमांतर्गत लष्करातील जवानांचा सन्मान करून त्यांना शाल श्रीफळ मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येतो. यंदा भारतीय विजय दिनाचे ५०वे वर्ष असल्याने महाराष्ट्रातील ५० शहरांमध्ये हा विजय दिवस ‘शौर्या तुला वंदितो’ या उपक्रमात साजरा करण्यात आला.
चाळीसगाव सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे देखील हा कार्यक्रम येथील शासकीय विश्रामगृह येथे साजरा करून दिवंगत तिन्ही दलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांना पुष्पांजली वाहिली. त्यांच्यासोबत शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून गोकुळ पाटील-खेर्ङेसागर माने-हिरापुर विजय पाटील-वाघङु गुलाब देवरे-चाळीसगांव या लष्करी जवानांना सन्मानपत्र देऊन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते वर्धमान धाडीवाल सह्याद्री प्रतिष्ठान चे माजी अध्यक्ष दिलीप घोरपडे प्रमुख उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सह्याद्री प्रतिष्ठानचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख शुभम चव्हाण, तालुका अध्यक्ष विनोद शिंपी, जितेंद्र वाघ, निलेश हमलाई, डिगंबर शिर्के, गणेश पाटील, मुराद पटेल, अरिफ खाटीक, योगेश शेळके, रवींद्र सूर्यवंशी, सचिन पाटील, मोहन भोळे, विवेक रणदिवे, राजेद्र बाफना, दीपक राजपूत, सचिन घोरपडे, पै.सचिन पाटील, नाना चौधरी, गौरव पाटील, देवेश पवार, दिपक पवार, संदीप वराङे, जितेंद्र वरखेङे, रविंद्र दुसिंग, कैलास चौधरी, ललित बारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विराज वाघ या बाल दुर्गसेवकाने समर गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन जयवंत शेलार यांनी केले आहे.