साळवे ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथील प्रसिद्ध स्टँप वेंडर मनोहर वसंत पाटील (वय ५०) यांचा आज दुपारी विहिरीत पाय घसरून दुर्दैवी मृत्यू झाला.
येथील स्टँप वेंडर मनोहर पाटील हे आजप दुपारी साधारण ४ वाजेपुर्वी शेतात गेले होते. यावेळी अचानक पाय घसरून ते विहिरीत पडले. या अपघातात त्यांचे जागीच निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दि 5 फेब्रुवारी रोजी रात्री 8 :30 वाजता साळवे येथून त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे. शेवटचे वृत्त हाती आले, तेव्हा धरणगाव पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते. पुढील तपास पो.हे.कॉ करीम सय्यद हे करीत आहेत.