सांगली (वृत्तसंस्था) सांगलीतील भाजपचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते संभाजी पवार यांचं निधन झालं आहे. ते ८० वर्षांचे होते. काही वर्षांपूर्वी त्याच्या आयुष्यावर राजकीय पैलवान-संभाजी पवार हे पुस्तक प्रकाशित झाले होते. गेले काही वर्षे ते पार्किन्सनच्या जुनाट आजाराने त्रस्त होते. मुंबईच्या नानावटी रुग्णालयात उपचार घेताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यावरही त्यांनी हिमतीने मात केली होती.
वज्रदेही मल्लहरी नाना पवार यांचे सुपुत्र म्हणून ते ओळखले जात होते. मात्र अवघ्या काही क्षणात कुस्तीचा निकाल दुसऱ्या मल्लाला आसमान दाखवायंचं त्यांच्या या खास पद्धतीमुळे त्यांची बिजली मल्ल म्हणून ख्याती पसरली होती. महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, हरियाणा आदी राज्यांमध्ये त्यांचे चाहते होते. आपल्या कुस्तीने मिळलेल्या प्रसिद्धीनंतर त्यांनी राजकीय क्षेत्रातही नशीब आजमावले आणि स्व. वसंतराव दादा पाटील यांच्या हयातीत त्यांचे पुतणे सहकारमहर्षी विष्णू अण्णा पाटील यांचा सांगली मतदार संघातून विधानसभेला पराभव करत विजय मिळवला होता. २००९ साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशासाठी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भाजपचे प्रदेश उपाध्यक्षही होते.
२००९ साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशासाठी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. २०१४ साली पक्षातील स्थानिक नेत्यांशी झालेल्या मतभेदानंतर ते राजकीय दृष्ट्या बाजूला झाले होते. मात्र, तरी सातत्याने विविध प्रश्नांवर ते आपली मते मांडत असत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र, बंधू, पुतणे असा मोठा परिवार आहे. सर्वसामान्यांचा नेता हरपल्याची हळहळ सांगलीत व्यक्त होत आहे. आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. दुपारी १२ वाजेच्या सुमारास अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता जनतेला अंत्यदर्शनासाठी घेता येणार आहे.