मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक हे गेले अनेक दिवस एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर एकामागून एक आरोप करत आहेत. असं असताना आज नवाब मलिक यांनी एक नवं ट्विट करुन पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. यावेळी मलिक यांनी समीर वानखेडेंची मेहुणी ड्रग्स व्यवसायात आहे का? असा थेट सवाल विचारला आहे.
नवाब मलिक यांनी पुन्हा एक नवीन ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी काही स्क्रिनशॉट्सही जोडलेले आहेत. ट्वीटमध्ये मलिक म्हणतात, समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दिनानाथ रेडकर ही ड्रग्जच्या व्यवसायात सामील आहे की काय? तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल कारण तिच्याविरोधातली केस पुणे कोर्टात प्रलंबित आहे. या ट्वीटसोबत त्यांनी या प्रकरणातले पुरावेही दिल्याचं सांगितलं आहे.
याविषयी आज सकाळी मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, मी माझं म्हणणं ट्वीटमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे. केस पुण्याच्या कोर्टामध्ये प्रलंबित आहे. हे खरं आहे का? आणि त्यांचा समीर वानखेडेंशी काय संबंध आहे? याचा खुलासा वानखेडेंनी केला पाहिजे.
















