मुंबई (वृत्तसंस्था) समीर वानखेडे यांचा धर्म मुस्लिम आहे. त्यांच्या सेंट जोसेफ कॉलेजच्या लिव्हिंग प्रमाणात्रात तसे नमूद केले असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
समीर वानखेडे यांचा धर्म मुस्लिम आहे. त्यांच्या सेंट जोसेफ कॉलेजच्या लिव्हिंग प्रमाणात्रात तसे नमूद केले आहे. तसेच त्यांच्या जन्मप्रमाणपत्रावर समीर दाऊद वानखेडे असा उल्लेख असून त्यात मुस्लिम असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यांनी कागदपत्रांत खाडाखोड करून फर्जीवाडा केला आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. आज दुपारी या प्रकरणावर मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मलिक यांनी या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘मी एका पक्षाचा जबाबदार आमदार, प्रवक्ता आहे. त्यामुळे हायकोर्टाचे निरीक्षण नोंदवत पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आम्ही पुरावे सादर केले आहेत. वानखेडे यांच्या शाळेतील लिव्हिंग सर्टिफिकेटवर मुस्लिम असल्याचा उल्लेख आहे. वानखेडे यांनी एका आयपीएस अधिकाऱ्याशी वाद झाल्यानंतर त्यांच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणात अडकवले. जेथे कारवाई झाली त्या इमारतीत कुठलीही रेड झाली नाही. त्यांनी मुलाला बाहेर बोलावून घेतले आणि त्याला केसमध्ये अडकवले. अशा प्रकारे अनेकांना त्यांनी खोट्या केसेसमध्ये अडकवले आहे.