धरणगाव (प्रतिनिधी) शहरात लग्न, वाढदिवस यासह विविध समारंभामध्ये वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंमुळे कचऱ्याची समस्या निर्माण होते.त्यावर उपाय म्हणून धरणगाव नगरपरिषदेने बर्तन बँकेची स्थापना केली होती. यामध्ये विविध समारंभासाठी भोजनाकरिता लागणारे ताट ग्लास इत्यादी वस्तू माफक दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जेणेकरून करून नागरिक प्लास्टिक वस्तूंचा वापर टाळतील आणि कचऱ्याच्या समस्येला आळा बसेल.
आज दिनांक 29 मे 2025 रोजी मोठा माळी वाडा परिसरातील रहिवासी संजय महाजन यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नामध्ये बरतन बँकेतील ताटांचा वापर करून पर्यावरण संवर्धन व स्वच्छतेचा संदेश दिला. त्यामुळे संजय महाजन यांचे समाजात तसेच गावात कौतुक होत आहे. त्यानिमित्ताने ना. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संजय महाजन यांचा शाल व वृक्षाचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी धरणगाव शहरातील सर्व नागरिकांनी नागरिकांनी आपल्या लग्न,वाढदिवस यासारख्या कार्यक्रमासाठी बरतन बँकेतील ताट ग्लास यांचा वापर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी केले.
असे आहेत बरतन बँकेचे दर
ताट: ०.५० पैसे प्रति ताट/प्रतिदिन,(१००० ताटांकरीता ५००/- रुपये)
ग्लास : ०.२५ पैसे प्रति ग्लास/प्रतिदिन (१००० ग्लासंकरीता २५०/- रुपये)
वापर झाल्यानंतर स्वच्छ केलेले ताट/ग्लास बरतन बँककडे जमा करणे आवश्यक राहील.













