जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल संजय पवार यांचा सत्कार करण्यात आला.
सध्या ज्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे लक्ष लागून आहे. सर्वच राजकिय पक्षांची या निवडणुकीत तारेवरची कसरत होत असतांना काही मुरब्बी लोकांची बिनविरोध निवड झाली. महाविकास आघाडीच्या एकूण तीन सदस्यांची जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोध निवड झाली यामध्ये चांदसरचे संजय पवार यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली. याबद्दल त्यांच्या जळगाव येथील राहत्या घरी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक वाघमारे, जागृती युवक मंडळ धरणगावचे माजी अध्यक्ष आनंदराज पाटील, पिंपळे येथील प्रगतिशील शेतकरी गोपाल पाटील, विकल्प ऑर्गनायझेशन चे कार्याध्यक्ष लक्ष्मण पाटील, लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक विजय पाटील, मार्केट कमिटीचे माजी सभापती रंगराव सावंत, सामाजिक कार्यकर्ते भैय्याभाऊ पाटील उपस्थित होते. याप्रसंगी संजय पवार यांच्या बिनविरोध निवडीबद्दल शुभेच्छा व्यक्त करतांना प्रगतिशील शेतकरी गोपाल पाटील यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी पीक कर्ज वाढवून मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.