मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईच्या गोरेगावमधील पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आज पुन्हा एकदा ईडीच्या विशेष कोर्टामध्ये आज हजर करण्यात आले. सुनावणीअंती त्यांना ८ ऑगस्टपर्यंत कोठडी मिळाली. दरम्यान, संजय राऊत यांनी कोठडीमध्ये आपल्याला ज्या ठिकाणी मला ठेवलंय तिथे वेंटिलेशन नाही. मला हृद्यविकाराचा त्रास असल्याने गुदमरायला होते, अशी तक्रार केली. त्यानंतर कोर्टाने राऊत यांची काळजी घ्या, असे आदेशच कोर्टाने ईडीला दिले.
पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय साऊत यांना ईडीने चार 31 ऑगस्ट रोजी अटक केली होती त्यानंतर कोर्टात हजर केले असता ३ दिवसांची कोठडी सुनावली होती. आज कोठडी संपल्यामुळे पुन्हा एकदा संजय राऊत यांना विशेष इडी कोर्टात हजर केले. संजय राऊत कोर्टात धनुष्य बाण चिन्ह असलेला भगवा मफलर घालून आले होते तो मफलर त्यांनी काढला जेव्हा त्यांना लक्षात आले की, ते कोर्टात आले. त्यानंतर सुनावणी सुरू झाली. सुनावणीनंतर त्यांना संजय राऊतांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली.
राऊतांची तक्रार, कोर्टाचे ईडीला थेट आदेश !
सुनावणीदरम्यान कोर्टाची एक पद्धत असते की, कोर्ट आरोपीला विचारतं की तुम्हाला काही त्रास आहे का? यावर संजय राऊत यांनी कोर्टाला सांगितलं की, मला ठेवलंय तिथं हवा खेळती नाही. हृदयविकाराचा त्रास असल्यानं आपल्याला श्वसनाचा त्रास होतो आहे. याबाबत मी ईडीच्या अधिकाऱ्यांना देखील सांगितलं आहे. त्यावर ईडीने याबाबत दिलगिरी व्यक्ती करतो. पण त्यांना जिथे ठेवलंय तिथे एसी आहे. कारण संपूर्ण इमारत एअर कंडिशनर आहे. जर त्यांना एसी नको असेल तर अशा अनेक रुम आहेत जिथे आम्ही त्यांना ठेवू शकतो. त्यावर संजय राऊत यांनी मला एसीचा त्रास होतो. थोडी हवा तरी हवी ना, असे सांगितले. यानंतर संजय राऊत यांना आता नॅान एसी रुममध्ये ठेवणार, असल्याचे ईडीने कोर्टाला सांगितले. यावर न्यायमूर्तींनी ईडीने त्यांची व्यवस्थित काळजी घ्यावी कारण ते इडीच्या कोठडीत आहेत, असे सांगीतले.
राऊत आणि ईडीच्या अधिकाऱ्यात वाद
ईडीच्या बॅलर्ड पिअर येथील कार्यालयातून कोर्टाच्या दिशेने निघत असताना संजय राऊत आणि ईडीच्या एका अधिकाऱ्यात वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. संजय राऊत ईडीच्या कार्यालयाबाहेर निघून गाडीत बसत होते. त्यावेळी संजय राऊत यांना भेटण्यासाठी त्यांचे बंधू सुनील राऊत, जावई मल्हार नार्वेकर आणि शिवसेनेचे काही कार्यकर्ते आले होते. संजय राऊत या सगळ्यांशी बोलत उभे राहिले होते. तेव्हा राऊत यांच्यासोबत असणाऱ्या ईडीच्या अधिकाऱ्याने त्यांना हटकले. तुम्ही अशाप्रकारे इतरांशी बोलू शकत नाही. तुम्ही ईडीच्या कोठडीत आहात, त्यामुळे ही गोष्ट योग्य नाही. आपल्याला कोर्टात निघायचे आहे, असे या अधिकाऱ्याने संजय राऊत यांना सांगितले. त्यामुळे संजय राऊत आणि ईडीच्या अधिकाऱ्यात थोडाफार वाद झाला. त्यानंतर संजय राऊत गाडीच्या दिशेने गेले.