अमळनेर (प्रतिनिधी) येथील संत रोहिदास विकास फाऊंडेशन तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विश्वकर्मा मंदिर सभागृह ढेकुरोड येथे मोफत आरोग्य शिबीर, तसेच शिव स्मारक परिसरात घरकाम करुन कुटुंब सांभाळणाऱ्या महिलांचा सत्कार, डॉक्टर, वकील, उदयोग, सामाजिक, पत्रकार, शैक्षणिक, असे विविध क्षेत्रात कष्टकरी महिलांचा संत रोहिदास फाउंडेशन पदाधिकारी व समाज बांधवतर्फे सत्कार करण्यात आले.
या बाबत सविस्तर असे की अमळनेर येथील विघ्नहर्ता हाॅस्पीटल चे संचालक डाॅ.मनिष साहेबराव चव्हाण बालरोग तज्ञ आय यू. विभाग. तसेच सहकारी कर्मचारी उपस्थित होते. या शिबिरात महिला समाज बांधवाणी लहान मुले, जेष्ठ नागरिक यांचे हिमोग्लोबीन, शुगर, बी. पी. वजन, इत्यादी तपासणी करण्यात आल्या. या शिबिराला नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहुन तपासणी करून घेतल्या. डाॅ. मनीष चव्हाण यांनी आरोग्यविषयक मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात डाॅ.मनिष चव्हाण यांचे स्वागत रविंद्र देवरे, दिनेश मोरे यांनी केले. तसेच कार्यक्रमात सहभाग घेणारे डॉक्टर व कर्मचारी संत रोहिदास फाऊंडेशनच महाराष्ट्र अध्यक्ष शारदाताई उंबरकर, खान्देश अध्यक्षा उषाताई देवरे, अमळनेर तालुुका अध्यक्ष मीनाताई क्षीरसागर व संगीताताई मोरे, ज्योतीताई मोरे, शोभाताई सोनवणे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला संत रोतहिदास फाऊंडेशनाचे पदाधिकारी व महिला समाज बांधव उपस्थित केले.
तसेच ढेकू रोड येथील शिव स्मारक परिसरात जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्षा डॉ. विनिता चव्हाण, ताराबाई चव्हाण यांच्या हस्ते केक कापून महिलांचा द्विगुणित केला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील महिला पत्रकार जयश्री दाभाडे, सखी कलेकशन च्या उद्योजिका आरती रेजा, ॲड मिनाक्षी राठोड, प्रा.शिला पाटील, निलिमा सोनकुसरे, आदी उपस्थित होत्या. व फाउंडेशनच्या महिला पदाधिकार्यांनी सावित्रीबाई फुले- शारदा उंबरकर, जिजाऊसाहेब- उषा देवरे, अहिल्याबाई होळकर- संगीता मोरे, बहिणाबाई चौधरी- मीना क्षीरसागर, झाशी राणी- वीरा भवरे ईत्या दिनी वेषभूषा प्रधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच वेषभूषा प्रधान करणाऱ्या महिलांनी या थोर महिलांचे बाबतीत 1-2 वाक्यात आपले मनोगत व्यक्त केले. महिला व मुलींनी या वेशभूषा मध्ये सहभाग घेतला त्यांना प्रोत्साहनसाठी तालुका अध्यक्षा मिना क्षिरसागर यांनी बक्षिसे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संत रोहिदास फाऊंडेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा शारदा उंबरकर खान्देश अध्यक्षा उषा देवरे अमळनेर तालुका अध्यक्ष मीना क्षीरसागर तालुका सचिव संगीता मोरे, तालुका महिला सहसचिव वैशाली गांगुर्डे त्या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. समाजातील सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.