मुंबई (वृत्तसंस्था) सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) छाप्यामुळे अडचणीत आलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी अभिनेत्री कंगना रनौतविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे. ‘पाकिस्तानी क्रेडिट कार्ड संबंधी कंगनाने सोशल मीडियावर टाकल्याने माझी बदनामी झाली आहे,’ असा आरोप सरनाईकांनी केला आहे.
प्रताप सरनाईक यांच्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचा आरोप कंगनाने केला होता. याविरोधात प्रताप सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली असून हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, अभिनेत्री कंगनाने एक ट्विट केलं होतं, ज्यामध्ये मुंबईत आल्यानंतर तोंड फोडण्याची गोष्ट करणाऱ्यांच्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडलं आहे. तिच्या ट्विटच्या आधारे अनेकांनी बातम्या केल्या. ईडीच्या कोणत्याही अधिकाऱ्याने घरी काय सापडलं याची माहिती दिलेली नाही. कंगनाकडून अशा पद्धतीचं बदनामी करणं चुकीचं आहे, असं सरनाईक म्हणाले. प्रताप सरनाईक यांनी पाकिस्तानी क्रेडिट कार्डच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. ज्या पाकिस्तानचे जगात क्रेडिट नाही त्यांचे क्रेडिट कार्ड घेऊन मी काय करु? असा सवालही यावेळी सरनाईक यांनी विचारला आहे. सरनाईक म्हणाले की, ‘अभिनेत्री कंगनाने एक सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. ज्यामध्ये मुंबईत आल्यानंतर तोंड फोडण्याची गोष्ट करणाऱ्यांच्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडले आहे असे म्हटले होते. तिच्या ट्विटच्या आधारे अनेकांनी बातम्या केल्या. ईडीच्या कोणत्याही अधिकाऱ्याने घरी काय सापडले याची माहिती दिलेली नाही. कंगनाने अशा पध्दतीने बदनामी करणे चुकीचे असल्याचे सरनाईक म्हणाले.
तसेच पुढे सरनाईक म्हणाले की, ‘माझ्या घरात असे काहीही सापडले नाही. असे असतानाही माझी व माझ्या कुटुंबीयांची बदनामी करण्याकरता कंगनाने हे सोशल मीडियावर टाकले होते. त्यामुळे देशभरात माझी बदनामी झाली. यामुळेच अशा बातम्या देणाऱ्या माध्यमांच्या व कंगनाच्या विरोधात मी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे,’ अशी माहिती सरनाईक यांनी दिली आहे.