नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी नियमांमध्ये बदल केले आहेत. नवीन नियमानुसार, आता ग्राहक स्टेट बँकेच्या योनो अॅप्लिकेशनमध्ये फक्त त्याच फोन नंबरवरून लॉग-इन करू शकतात ज्याची बँक खात्यात नोंदणी केली जाईल. या नियमानंतर तुम्ही कोणत्याही फोन नंबरवरून बँकेची सेवा घेऊ शकत नाही.
ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढल्याने एसबीआयने त्यांच्या योनो अॅपमध्ये हे बदल केले आहेत. यामुळे ग्राहकांचे व्यवहार आधीपेक्षा जास्त सुरक्षित होणार आहेत. तसेच ग्राहक ऑनलाईन फ्रॉडपासूनही वाचणार आहेत. ग्राहकांनी नवीन रजिस्ट्रेशनसाठी ज्या स्मार्टफोनमध्ये एसबीआय अकांउंटला जोडलेला मोबाईल नंबर असेल त्याच स्मार्टफोनचा वापर करावा, असा सल्ला एसबीआयने दिला आहे. योनो अॅपमधील बदलानुसार तुम्ही कोणत्याही फोनद्वारे लॉग इन करू शकणार नाही आहात. या आधी ग्राहक कोणत्याही फोनमधून लॉगइन करू शकत होते.
योनो अॅपबरोबरच बँकेने एटीएमशी संबंधित नियमही बदलला आहे. जेव्हा कधी तुम्ही एटीएममध्ये १०००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी जाल तेव्हा तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर सोबत ठेवावा लागणार आहे. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओटीपी येईल, तो तुम्हाला एटीएम मशीनमध्ये पिन टाकल्यानंतर टाकावा लागणार आहे. त्यानंतर तुम्ही पैसे काढू शकणार आहात. ९९९९ रुपयांपेक्षा कमी रक्कम काढणार असाल तर त्यासाठी ओटीपीची गरज नाही. ही सुविधा रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत आणि एसबीआयच्याच एटीएम सेंटरमध्ये उपलब्ध आहे. अन्य बँकांच्या एटीएम सेंटरमध्ये ती काम करणार नाही.