मुंबई (वृत्तसंस्था) मनोज सानेने त्याची गर्लफ्रेंड सरस्वती वैद्यची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट तो तब्बल चार दिवस लावत होता. मनोजने सरस्वतीच्या मृतदेहाची छायाचित्रे काढली होती. मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची? यासाठी त्याने गुगलवर माहिती सर्च केली होती, अशी धक्कादायक माहिती पोलिसात तपासात समोर आली आहे.
मनोजने सरस्वती वैद्य यांच्या मृतदेहाचे विद्युत करवतीने आणि एक्सॉ ब्लेडच्या सहाय्याने असंख्य बारीक तुकडे केले होते. हे तुकडे मनोजने प्रेशर कुकरमध्ये टाकून शिजवले होते, त्यानंतर मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक पेस्ट तयार केली होती. अशाप्रकारे मनोज एक-एक करुन सरस्वती वैद्य यांच्या मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावत होता. भयानक म्हणजे मृतदेहाचे तुकडे तो कुत्र्यांना देखील खाऊ घालत असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी मनोजच्या फ्लॅटमधून सरस्वती यांच्या मृतदेहाचे १७ ते १८ तुकडे हस्तगत गेले होते. मात्र, त्यांचे शिर सापडले नव्हते. मनोजने सरस्वतीचे मुंडके कुठे टाकले, याचा पोलिसांकडून शोध होणे अपेक्षित होते. परंतु, मनोजने चौकशीदरम्या आपण सरस्वती वैद्य यांच्या मृतदेहाच्या डोक्याचेही असंख्य तुकडे केल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांचाही थरकाप उडाला होता.
मनोजने सरस्वती वैद्य यांच्या मृतदेहाचे विद्युत करवतीने आणि एक्सॉ ब्लेडच्या सहाय्याने असंख्य बारीक तुकडे केले होते. हे तुकडे मनोजने प्रेशर कुकरमध्ये टाकून शिजवले होते, त्यानंतर मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक पेस्ट तयार केली होती. अशाप्रकारे मनोज एक-एक करुन सरस्वती वैद्य यांच्या मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावत होता.
रेशनच्या दुकानात सरस्वती आणि मनोजची ओळख झाली. सरस्वतीशी त्याची ओळख झाली त्यानंतर मनोजने तिचा विश्वास संपादन केला. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी मंदिरात लग्न केलं होतं. मात्र दोघांच्या वयात भरपूर अंतर होतं. त्याचमुळे या दोघांनी लग्न लपवलं होतं.