TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विज्ञान प्रदर्शन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना दिशा देणारे व्यासपीठ : गुलाबराव पाटील !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 3, 2022
in जळगाव, धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ आहे. त्याचा उपयोग करुन विद्यार्थ्यांनी देश व राज्य पातळीवर आपल्या शाळेचे नाव उंचवावे, असे प्रतिपादन पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पाळधी येथील 49 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन वेळी ते बोलत होते.

शिक्षण विभाग पंचायत समिती धरणगाव व भाऊसाहेब गुलाबराव पाटील स्कूल कॅम्पस पाळधी यांच्या संयुक्त विद्यमाने 49 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पाळधीच्या जीपीएस कॅम्पस येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी मंत्री पाटील यांच्यासह मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उपकरणांची पाहणी करून शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तालुक्यातील जि. प. शाळा निंभोरा येथील शाळेचा नवोदय मध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त केल्याबद्दल मुख्याध्यापकांसह शिक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.नितीन बच्छाव यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले, आजचे जग विज्ञान शिक्षणावर आधारित आहे. ग्रामीण भागात बुद्धिमत्ता आहे. तिला योग्य वळण देण्यासाठी शिक्षकांनी आपले ज्ञान अद्ययावत ठेवून मुलांचे दीपस्तंभ व्हावे. तर प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील म्हणाले, विद्यार्थी सक्षम होण्यासाठी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उपयुक्त ठरत असते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी रविकिरण बिऱ्हाडे यांनी केले.

READ ALSO

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

या प्रदर्शनात 123 शाळांनी सहभाग नोंदवून, विद्यार्थ्यांनी आपल्या विविध प्रकल्पांचे यशस्वी सादरीकरण केले. सदर कार्यक्रमाला संपूर्ण तालुक्याभरातून विविध शाळांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली. विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षणाचे कार्य डी. ए. धनगर, संजय पाटील, आर. सी. कोळी, वंजारी यांनी केले. या विज्ञान प्रदर्शनात इयत्ता सहावी ते आठवी या उच्च प्राथमिक गटात गुड शेफर्ड स्कूल धरणगावच्या विद्यार्थ्याचा बायोक्लॉक उपकरणाला प्रथम क्रमांक मिळाला. द्वितीय क्रमांक अंकिता ज्ञानेश्वर बोरसे- (जि प उच्च प्राथमिक शाळा निंभोरा, स्मार्ट हेल्मेट उपकरण) तर तृतीय क्रमांक राज गुलाब पाटील (माध्यमिक विद्यालय भोणे, गणितीय खेळणे ) या विद्यार्थ्याला मिळाला. एक दिवसीय विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथमिक 52 व 38 माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात विद्यार्थ्यांनी उपकरणांची मांडणी केली होती.

यावेळी उद्घाटन समारंभास जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉ. नितीन बच्छाव, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, डायटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे , धरणगाव गटविकास अधिकारी सुशांत पाटील, जीपीसचे कार्यकारी संचालक तथा तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, गट शिक्षणाधिकारी रविकिरण बिऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
Next Post

जळगावात वृद्धाने संपविली जीवनयात्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : पोलिसांसोबत वाद घालणारी ‘झोमॅटो गर्ल’ एक वर्षापासून तुरुंगातच !

September 28, 2020

गुगलवर 30 हजार भाविकांनी शोधले मंगळ ग्रह मंदिर !

June 28, 2023

खंडणीप्रकरणी पिंपरीत भाजपच्या विद्यमान नगरसेवकाला अटक

February 2, 2022

तीन वर्षापासून फरार असलेला जसवंतसिंग उर्फ जस्सीला मध्यप्रदेशातून अटक ; अकोला एलसीबीची कारवाई !

October 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group