धरणगाव (प्रतिनिधी) प्रशासन राज लागल्यानंतरही सत्ताधारी शिवसेनेकडून नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्या जालना चा दुरुपयोग होत असून त्यामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करत भाजपने आंदोलनाचा इशारा दिला आहे,.
शिवसेनेचे नगरसेवक छोटे मोठे कार्यक्रम नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या दालनात घेतात. यामुळे नगरपालिकेची लाईट बिलची नासाडी या दोन्ही दालनातून होतांना दिसते. मुख्याधिकाऱ्यांनी या दोन्ही दालनाला तात्काळ कुलूप लावून सील बंद करावे. तसेच दोन्ही दालन सील बंद न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीने दिला आहे.
नगरसेवकांची मुदत संपून प्रशासक राज असतांना देखील शिवसेनेचे नगरसेवक छोटे मोठे कार्यक्रम नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष दालनात घेत असतात. वास्तविक पहाता पालिकेची मुदत संपलेली आहे. त्यामुळे त्यांना तेथे वाढदिवसाचे व इतर कार्यक्रम ज्यातून गावाचा काहीही विकास होत नसतांना देखील असे कार्यक्रम शासकीय जागेत करणे कायद्याने चुकीचे आहे. यामुळे नगरपालिकेची लाईट बिल नासाडी या दोन्ही दालनातून होतांना दिसते. काहीही काम नसतांना विजेचा दुरुपयोग होत आहे. त्याच बरोबर नगरपालिकेचे शिपाई यांना देखील मुदत संपलेल्या नगरसेवकांची कामे ऐकावी लागत आहे. तरी प्रशासक म्हणून मुख्याधिकारी यांनी या गोष्टी कडे लक्ष देऊन दोन्ही दालन तात्काळ कुलूप लावून सील बंद करावे अन्यथा सोनवद रोडवरील स्मशानभूमी प्रमाणे रात्रीतून काही अनुचित प्रकार घडल्यास मुख्याधिकारी व नगरपालिका प्रशासन जवाबदार राहील व दोन्ही दालन त्वरीत कुलूप लावून सील बंद न केल्यास भारतीय जनता पार्टी आंदोलन करेल, असे भाजपने कळविले आहे.