पातोंडा (प्रतिनिधी) तालुक्यातील पातोंडा येथील डॉ.अकबर खा हैदरखा पठाण ह्यांची २० ऑक्टोबर २०२० रोजी घेण्यात आलेल्या समुदाय आरोग्य अधिकारी या पदासाठी निवड झाली आहे.
अमळनेर तालुक्यातुन त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला असून युनानी डॉक्टर म्हणून त्यांनी सदरचे यश प्राप्त केले आहे. त्यांच्या यशामुळे कुटुंब, गाव व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अकबर खा यांची समुदाय आरोग्य अधिकारी या पदासाठी आरोग्य विभाग नंदुरबार येथे निवड झाली आहे. अकबर खा हे पातोंडा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक हैदरखा गोरेखा पठाण यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या निवडीचे गावकऱ्यांनी कौतुक केले असून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.















