बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील साळशिंगी येथील प्रगतीशील शेतकरी जितेंद्र चौधरी यांचा मुलगा ऋषिकेश चौधरी यांची उच्च शिक्षणासाठी महाराष्ट्र शासनाच्या विदेश शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.
ऋषिकेश ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न येथे तीन वर्ष मास्टर्स ऑफ कन्स्ट्रक्शन मॅनेजमेन्ट चे शिक्षण घेणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या परदेशी शिष्यवृत्ती योजनेच्या प्रवेश परीक्षा व मुलाखत या प्रक्रियेत होतकरू विद्यार्थ्यांची निवड केली जाते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च शासन करते. पुणे येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात बी ई सिव्हील या शाखेतून ऋषिकेश प्रथम श्रेणीतून पदवीधर झाला असून त्यानंतर त्याने या शिष्यवृत्तीसाठीची पात्रता परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्याची निवड करण्यात आली. ऋषिकेशच्या या यशाबद्दल त्याचे तालुक्यात कौतुक करण्यात येत आहे.