धरणगाव (प्रतिनिधी) संभाजी ब्रिगेडतर्फे रविवारी जिल्हा व महानगर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे नाशिक विभागीय अध्यक्ष श्याम पाटील, जिल्हाध्यक्ष तुषार सावंत, महानगराध्यक्ष संदीप पाटील उपस्थित होते.
श्याम पाटील यांनी यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संभाजी ब्रिगेडच्या कार्याविषयी माहिती दिली. अमोल पाटील – धरणगाव तालुकाध्यक्ष, संभाजी पाटील- एरंडोल तालुकाध्यक्ष, नीलेश चौधरी- जिल्हा प्रसिद्धीप्रमुख, महानगर पदाधिकाऱ्यांमध्ये माया पवार उपमहानगर अध्यक्ष, सतीश लाठी शहरउपाध्यक्ष, संदीप मांडोळे कार्याध्यक्ष, भरत पाटील सहसंघटक, अविनाश पाटील सचिव, प्रफुल्ल पाटील कार्यकारी सदस्य, कुंदन पाटील शहर प्रवक्ता, राजेंद्र पाटील शहर संघटक, बाळ पाटील उपाध्यक्ष, गोपाळ पाटील – प्रसिद्धी प्रमुख, वरूण नागपुरे सोशल मीडिया प्रमुख यांची नियुक्ती झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष तुषार सावंत, महानगराध्यक्ष संदीप पाटील, मयूर चौधरी, सागर कोळी, प्रमोद कुंभार, सचिन पाटील, कौस्तुभ पाटील, राकेश कोठारी, सागर पाटील, प्रवीण पाटील, शेखर कोळी, भगवान पाटील, रवींद्र पाटील, जितेंद्र सावंत यांनी सहकार्य केले.