चोपडा (प्रतिनिधी) दि. 12 मार्च 2024 रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अध्यापक विद्यालय चोपडा व शिक्षणशास्त्र महाविद्यालय चोपडा जि.जळगाव अंतर्गत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (53219) या अभ्यासकेंद्रावर व्यक्तिमत्त्व विकास शिबीरात आरोग्य व आहार आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या दोन विषयांवर व्याख्यान आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्र संयोजक प्रा. किरण पाटील सरांनी प्रास्ताविकात व्यक्तिमत्त्व विकास शिबीर आयोजित करण्यामागील उद्देश विद्यार्थ्यांना सांगितले. मान्यवरांचे स्वागत अभ्यासक्रमाचे केंद्र सहाय्यक श्री महेंद्र पटेल यांनी गुलाबपुष्प देऊन केले. डाॅ. संजय पाटील यांनी आरोग्य व आहार या विषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे समाधानकारक उत्तरे दिली. प्रा. मनोहर मराठे सरांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर व्याख्यानात आतापर्यंत धोरणाची माहिती देऊन यापुढील शैक्षणिक धोरण कसे असणार आहे, त्याचामुळे जगभरात रोजगाराच्या संधी मिळेल व पुढील शिक्षण हे विविध प्रकारचे व्यवसाय कौशल्य शिक्षणावर आधारीत असणार आहे, असे आपल्या व्याख्यानात स्पष्ट केले.
शेवटी अध्यक्षीय भाषणात प्रा. एम. पी. पाटील सरांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुजय धनगर सरांनी केले तर फलक लेखन श्रीमती मिनल मॅडम यांनी केले. प्रा. संजय देशमुख सरांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीमती स्वाती गुजराथी मॅडम, रश्मी शेख मॅडम, श्री दिपक विसावे या सर्वांनी सहकार्य केले.