अमळनेर (प्रतिनिधी) कोविड १९ च्या महामारीत नियमांचे पालन करून आणि धार्मिक सणांची संस्कृती जपत अंबिका फोटो स्टुडिओतर्फे महिला भगिनींसाठी आयोजित सेल्फी गुढी सजावट स्पर्धेत सोनल भांडारकर विजेत्या ठरल्या आहेत. १३ एप्रिल रोजी गुढी पाडव्याच्या दिवशी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत ५७ महिना भगिनींनि भाग घेतला. विजेत्या स्पर्धकांचा पारितोषिक व प्रशस्तीपत्र सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. सेल्फी विथ गुढीपाडवा या कोरोनाच्या काळात आयोजित स्पर्धेत महिलांच्या नटून थठुन झालेल्या कार्यक्रमात अतिशय सुंदर अश्या सजवटीमध्ये विजयी स्पर्धकांची निवड प्रांत सीमा अहिरे व मुख्याधिकारी विद्या गायकवाड यांनी केली.
प्रथम क्रमांक –
सोनल भांडारकर – न्यू प्लॉट, ७०१ रुपये
द्वितीय क्रमांक – मृणाल रविंद्र मुसळे लक्ष्मी नगर, ५०१ रुपये
तृतीय क्रमांक – नेहा किशोर देशपांडे
यांनी परितोषिक मिळवले. त्यांना त्यांचे बक्षीस त्यांच्या बँक खात्यात व प्रशस्तीपत्र सुध्दा ऑनलाइन त्यांना पाठवण्यात आले. प्रांत सीमा अहिरे व मुख्याधिकारी विद्या गायकवाड यांनी विजेत्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्यात. व आयोजक महेंद्र पाटील यांना अश्याच पध्दतीने महिलांसाठी नवनवीन उपक्रम राबवत रहावे, असे आवाहन करून शुभेच्छा दिल्यात. त्याचप्रमाणे रुपाली चेतन राजपूत व उज्वला शिरोडे यांना सुध्दा उत्तम सजावटीसाठी प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
ही स्पर्धा महिलांसाठी होती, परंतु विशेष पारितोषिक मयूर बारस्कर या मुलाने सुध्दा गुढी सोबत फोटो पाठवले. त्याने गुढीला मास्क व सॅनिटायझर लावुन छान संदेश दिला असल्याने व संकल्पना चांगली असल्याने त्याला सुद्धा प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. अंबिका फोटो स्टुडिओचे संचालक महेंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले होते.