TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दूध संघामार्फत ९०% मादी वासरे पैदासीसाठी विर्यमात्रा उपलब्ध

The Clear News Desk by The Clear News Desk
November 13, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र साहाय्यित योजना राष्ट्रीय गोकूळ मिशन अंतर्गत लिंग विनिश्चित वीर्यमात्राचा (सेक्स सॉर्टेड सिमेन) गायी व म्हशी मध्ये कृत्रीम रेतनासाठी वापर करण्यासाठीचा उद्घाटन कार्यक्रम संघाच्या आवारात सुविधा भवन येथे आज आयोजीत करण्यात आला होता. यावेळी दूध संघामार्फत ९०% मादी वासरे पैदासीसाठी विर्यमात्रा उपलब्ध करण्यात आले आहे.

 

READ ALSO

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

या कार्यक्रमाचे उद्घाटन जळगाव दूध संघाचे चेअरमन वसंतराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये तसेच जिल्हा पशुसंर्वधन उपआयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी डॉ. निलेश चोपडे व जिल्हा कृत्रीम रेतन अधिकारी डॉ. प्रदिप पाटील व संघाचे अधिकारी, दूध संस्थांचे चेअमन, प्रगतीशील दूध उत्पादक व संघाचे कृत्रीम रेतन तंत्रज्ञ उपस्थित होते.

 

लिंग विनिश्चित वीर्यमात्रा तयार करण्यासाठी मोठा खर्च येत असतो. मात्र यासाठी केंद्र शासन रु.२६१, राज्य शासन रु.१४० व जळगाव दूध संघ रु.१०० एकूण असे रु. ५०१ अनुदान प्राप्त होणार आहे. दूध उत्पादकांना विर्यमात्रा फक्त रक्कम रु. ८१/- उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. परंतु केंद्र शासनाने देशात दूध उत्पादन वाढविण्यासाठी नविन प्रणालीचा वापर करण्यास प्रोत्साहन दिलेले आहे. या योजनेतून ९० टक्के मादी वासरांची अचूकतेसह निर्मिती, उच्च अनुवंशिक मादी वासरांची उत्पत्ती करुन दूध उत्पादन व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे तसेच दूग्ध व्यवसाय करण्या इच्छूक असलेल्या शेतकरी व दूध धंदा व्यवसायिक उच्च अनुवंशिक वासरांची वाढीव उपलब्धता आदी फायदे होणार आहेत.

 

सध्या संघाकडे गिर, सहिवाल, जर्सी ५० टक्के, जर्सी १०० टक्के व मुऱ्हा या जातीच्या लिंग विनिश्चित विर्यमात्रा उपलब्ध झालेल्या आहेत. तरी सदर लिंग विनिश्चित विर्यमात्रा वापरासाठी शासनाच्या सुचनाप्रमाणे वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले. सदरील योजना प्रायोगितत्वावर असल्यामुळे मर्यादित ठिकाणीच उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी जागरुक राहून आपल्या निरोगी जनावरांस कृत्रीम रेतन करुन घेणेबाबत आवाहन दूध संघामार्फत करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमासाठी भालोद, कोल्हाडी, न्हावी, साजगांव, तारखेडा, डांगरी, देवगांव, तरडी, कुंवारखेडा, चहार्डी, कासोदा, या संस्थाचे प्रतिनिधी , कृत्रीम रेतन तंत्रज्ञ व संघाचे अधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

April 3, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

April 2, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
जळगाव

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
Next Post

कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा ; शिवसेनेची पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पालकमंत्र्यांचे घर आणि कार्यालयाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांचा दारु पिऊन धिंगाणा !

January 18, 2022

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

June 17, 2021

जामीन नामंजूर…कारागृहातील बंदीवानाने गिळला भिंतीवरील खिळा ; आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल !

November 6, 2022

मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून आमदारांना व्हीप जारी ; आमदारच नव्हे, कार्यकर्तेही टेंशनमध्ये !

July 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group