लखनऊ (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील बांदा येथील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) जिल्हा पंचायत सदस्य श्वेता सिंह गौर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात श्वेता सिंह यांचा पती आरोपी दीपक गौरचे संबंध आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटशी जोडलेले आहेत. ज्यामध्ये तो रशियन, मोरोक्कन आणि आफ्रिकन मुलींशी डील करत होता. त्याचे काही ऑडिओ कुटुंबाच्या माध्यमातून समोर आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, श्वेता सिंह मृत्यू प्रकरण अजूनही पोलिसांसाठी एक गूढच आहे, ज्यामध्ये अनेक टप्प्यांवर तपास सुरू आहे. पोलिसांची अनेक पथके तपासात गुंतली आहेत. या प्रकरणी दीपकला अटक करण्यात आली असली तरी निवृत्त डीआयजी सासऱ्यासह अन्य आरोपी अद्याप फरार आहेत. मात्र यादरम्यान अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. भाजपच्या जिल्हा पंचायत सदस्या श्वेता सिंह गौर या पती दीपकच्या वाईट सवयी आणि शोषणामुळे एवढ्या नाराज झाल्या होत्या की अनेक दिवसांपासून त्यांना आपल्या हत्येची भीती होती. यामुळे त्यांनी आपल्यावर होणारे सर्व अत्याचार पुरावा म्हणून रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली होती. हेच सर्व पुरावे अखेर त्यांच्या मृत्यूचं कारण ठरल्याचा दावा केला जात आहे.
श्वेता यांनी आपला पती दीपक रशियन मुलींची सौदेबाजी करत असल्याचा पुरावा गोळा केला होता, जो त्यांनी मृत्यूपूर्वी आपल्या कुटुंबीयांना दिला होता. श्वेताचा भाऊ ऋतुराज सिंह याने हा पुरावा मीडियासोबत शेअर करताना सांगितलं की, ‘दाजी दीपक अतिशय मद्यधुंद असायचा आणि विचित्र गोष्टी करायचा. रशियन मुलींना बोलावल्याची गोष्ट लपवण्यासाठीच त्याने श्वेता दिदीची हत्या केली’. एक ऑडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये दीपक रशियन मुलींचा पुरवठा करणाऱ्या दलालाला सांगतो, ‘मी बांदा येथून आलो आहे, सुनील सिंह गौतमने तुझा नंबर दिला आहे. व्यवस्था करावी लागली. तू त्यांना हॉटेलवर पाठवशील की मला यावं लागेल. रशियन की आफ्रिकन आहे? मुलीचा फोटो आणि रेट पाठवा, मग आम्ही निवडू.’
दुसऱ्या ऑडिओमध्ये दीपक म्हणतो, ‘मी रोख पैसे देईन, त्यानंतर दलाल म्हणतो की मुलगी रस्त्याच्या पलीकडे उभी आहे, तुम्ही ऑनलाइन पैसे द्या.’ दुसर्या संभाषणात दीपक म्हणतो, ‘एखाद्या रशियन मुलीला पाठवा किंवा 20 हजार रुपयांत दोन मुली करा, एक रशियन आणि एक भारतीय. त्यानंतर एका रशियन आणि मोरोक्कन तरुणीचा २३ हजार रुपयांना सौदा ठरला. तिसर्या ऑडिओमध्ये दीपक कथितपणे विचारतो, ‘रशियन मुलगी आहे? समोरून दलाल म्हणतो, रशियन नाही मोरोक्कन आहे. यावर दीपक म्हणतो की, ‘आम्ही चार जण आहोत, एक भारतीयही करा’. यावर दोघेही बराच वेळ बोलणी करतात.
संभाषणात दीपक आपलं लोकेशन शेअर करतो आणि म्हणतो की, ‘आम्ही लखनऊच्या नाका हिंदोला भागातील एमजे इंटरनॅशनल हॉटेलमध्ये थांबलो आहे, तुम्ही दोन्ही मुलींना तिथे पाठवा.’ या प्रकरणात पोलिसांनी आधीच सांगितलं आहे की या प्रकरणाशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्याचा तपास सुरू आहे. एसपी अभिनंदन म्हणाले की, आम्हालाही अनेक व्हिडिओ मिळाले असून आम्ही सर्वांची चौकशी करत आहो. पुरावे मिळाल्यावर आम्ही सर्व संबंधितांवर कारवाई करू. त्याचबरोबर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.