अमळनेर (प्रतिनिधी) गुन्हा मागे घेण्याच्या वादातून एकाला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील तरवाडे येथे घडली आहे. याप्रकरणी मारवड पोलिसात तब्बल १५ जणांविरुद्ध विनयभंगसह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास तरवाडे गावी फिर्यादी हे घरात बसले होते. त्यावेळी विजय सदाशिव पाटील, रवींद्र नाना पाटील, संदीप सदाशिव पाटील, सदाशिव वामन पाटील, सतीश नागराज पाटील, रोहीत सतीश पाटील, बाबुराव आधार पाटील, धीरज रामकृष्ण पाटील, रामकृष्ण अभिमन पाटील, वंदना रामकृष्ण पाटील, सुनंदा सतीश पाटील, चंद्रकला नागराज पाटील, मंगलाबाई सदाशिव पाटील, शीतल संदीप पाटील, विजय सदाशिव ची बायको (सर्व रा. तरवाडे) यांनी येवून घरात येवून सर्वानी लोखंडी रॉड, लोखंडी पाईप, लाकडी दांडका, काठ्या, चाकू, दगड आणि पेट्रोलची बॉटल आणून घरामध्ये प्रवेश केला. घरातील सोप्यावरच्या गादीवर पेट्रोल टाकून गादी पेटवून गादीसह फिर्यादीच्या मुलाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच घरातील गादी जाळली. गोदरेजचे कपाट फोडून त्यातील ६५ हजाराची रोकड व मुलाच्या हातातील १७ हजाराचा विवो कंपनीचा मोबाईल व गळ्यातील १५ ग्रॅमची चैन आणि फिर्यादीच्या गळ्यातील ६ ग्रॅमची मणी मंगळसुत्र ओरबाडले. मंगळसुत्र ओढतांना लज्जा उत्पन होईल, असे कृत्य केले. यावेळी संशयित आरोपींनी घरातील फर्निचरची मोडतोड केली. तसेच दंगल घडवून हल्ला केला. याप्रकरणी १५ जणांविरुद्ध विनयभंगसह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि जयेश खलाणे हे करीत आहेत.