पुणे (वृत्तसंस्था) दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीपात्रात ६ दिवसांमध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह आढळले होते. या सात जणांनी सामुहिक आत्महत्या केल्याची चर्चा होती. मात्र, या प्रकरणी आता मोठा खळबळजनक खुलासा झाला असून चुलत भावानेच खून करुन मृतदेह फेकले नदीत फेकल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
मोहन उत्तम पवार (वय ४५), त्यांची पत्नी संगीता उर्फ शहाबाई मोहन पवार (वय ४०, दोघे रा. खामगाव, ता. गेवराई, जि. बीड), जावई शाम पंडित फलवरे (वय २८), मुलगी राणी शाम फलवरे (वय २४ वर्षे), नातू रितेश उर्फ भैय्या शाम फलवरे (वय ७), छोटू शाम फलवरे (वय ५) आणि कृष्णा शाम फलवरे (वय ३, सर्वजण रा. हातोला, ता. वाशी, जि. धाराशिव) अशी मृतांची नावे आहेत.
मोहन पवार हे यांचे चुलत भावाने हे खून केल्याचे समोर आले आहे. मोहन पवार यांचा मुलगाबरोबर असताना तीन ते चार महिन्यांपूर्वी चुलत भावाच्या मुलाला अपघात झाला होता. तो मुलगा हॉस्पिटलमध्ये असतानाही मोहन पवार व त्यांच्या मुलाने ही बाब त्यांना सांगितली नाही. ४ दिवसानंतर मुलाच्या अपघाताची माहिती चुलत भावाला मिळाली. त्यानंतर त्या मुलाचा मृत्यु झाला होता. मात्र हा अपघाती मृत्यू नसून मोहन पवार यांनी खून केल्याचा संशय या चौघांना होता. या घटनेचा राग मनात धरुन चुलत भावाने या सर्वांची हत्या करुन त्यांचे मृतदेह नदीत फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, तर एक जण फरार आहे.