मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल आणि व्हॉट्सअॅप अकाऊंट काही काळासाठी हॅक झाले होते.. याबाबतची माहिती स्वतः सुळे यांनी एक्स माध्यमातून दिली आहे. तसेच डिजिटल सुरक्षेविषयी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
सुळे यांचे व्हॉट्सअॅप हॅक झाल्यानंतर काही तासांतच व्हॉट्सअॅप टीमकडून ते पूर्ववत करण्यात आले. त्याबद्दल त्यांनी पुन्हा ट्विट करत व्हॉट्सअॅप टीमचे आणि पुणे ग्रामीण पोलिसांचे आभार मानले तसेच नागरिकांना डिजिटल सुरक्षिततेविषयी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.. आवश्यक ती सर्व काळजी घेऊनही माझे व्हॉट्सअॅप हॅक झाले होते. कृपया, आपण सर्वजण डिजिटलम सुरक्षेविषयी आवश्यक ती काळजी घ्या. व्हॉट्सअॅप वापरताना टू फॅक्टर व्हेरिफिकेशन करून घ्या. आपले पासवर्ड, ओटीपी कुणालाही देऊन नयेत तसेच अनोळखी क्रमांकावरून आलेल्या लिंकवर क्लिक करू नये, असे सुळे यांनी म्हटले आहे.