चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील अठरा वर्षीय तरुणीला गफूर गबू तडवी (वय ३३, रा. बिडगाव) या संशयिताने जीवेठार मारण्याची धमकी देत तिच्याच घरात अत्याचार केले. त्यानंतर पिडीतेला किनगाव येथे घेवून जात अत्याचार करीत तेथेच सोडून दिले. याठिकाणी तरुणी एकटीच असल्याने दारुच्या नशेत असलेल्या तिघांनी तरुणीवर सामुहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी चौघांविरुद्ध अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं !
चोपडा तालुक्यातील एका गावात पीडित तरुणी एकटी असतासंना संशयित गफूर गबू तडवी याने दि. ३ जानेवारी रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पिडीतेचा घरात शिरला. त्याने पिडीतेला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. पुन्हा दुसऱ्या दिवशी तिला यावल तालुक्यातील किनगाव येथे बोलवून घेतले. त्याठिकाणी सरकारी दवाखान्याचे बांधकाम होत निर्जनस्थळी घेवून जात तेथे पुन्हा अत्याचार केले आणि तरुणीला एकटेच सोडून तो तेथून पसार झाला. दि.४ रोजी रात्रीच्या सुमारास तरुणी एकटीच असल्याचे दिसताच दारुच्या नशेत असलेल्या तिघ अनोळखी इसमांनी तरूणीला सहानुभूती दाखवित तिच्यावर सामुहिक अत्याचार केला. घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या तरुणीने तिच्यावर झालेल्या आत्याचाराची आपबिती आपल्या कुटुंबियांना सांगितली. त्यांनी अडावद पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार गफूर तडवी याच्यासह अन्य तिघांविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकाला अटक तर पथकाकडून तिघांचा शोध सुरु !
महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर एक संशयिताला पोलिसांनी अटक केली असून अन्य संशयिताचा शोधार्थ पथक रवाना झाले आहे. पथकाकडून इतर तिघ संशयितांचा शोध सुरु आहे. पुढील तपास सहाय्यक् पोलिस निरीक्षक गणेश बुवा हे करीत आहेत.
खा. रक्षाताई खडसेंनी घेतली पीडितेच्या कुटुंबियांची भेट !
महाविद्यालयीन तरुणीवर चौघांनी केलेल्या अत्याचारामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खासदार रक्षा खडसे यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली.