धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील विवाहितेवर चाकूच्या धाकावर विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. एवढेच नव्हे तर, पिडीतेचा पती आणि मुलाला देखील मारहाण करण्यात आली आहे. या संदर्भात धरणगाव पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३५ वर्षीय पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, १२ सप्टेंबर रोजी स्वयंपाक घरात स्वयंपाक करीत असतांना रामजी कृष्णा संदानशिव हा त्याच्या घराच्या मागील दरवाज्याने घरात घुसला. यानंतर त्याने पिडीतेस चाकूचा धाक दाखवून बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. पिडीतेने आरडाओरड केल्यानंतर पती व मुलगा असे धावत आले. तेव्हा रामजी कृष्णा संदानशिव याने पिडीतेच्या पतीवर चाकूने दाढीवर, डोळ्याखाली, कपाळावर वार करुन जखमी केले. त्यानंतर घराच्या अंगणात रामजीचे वडील नामे कृष्णा कामचंद संदानशिव व प्रतिपाल कृष्णा संदानशिव अशांनी हातात लाकडी दांडा व कु-हाड घेवून पिडीतेच्या पतीला व मुलाला मारहाण करून जबर दुखापत केली. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि जिभाऊ तु. पाटील हे करत आहेत.