अहमदनगर (वृत्तसंस्था) माजी नगराध्यक्षा राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गळ्याभोवती साडी गुंडाळलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला. मयत ४० वर्षीय महिला अहमदनगरमधील श्रीगोंदा शहरात राहत होत्या.
श्यामला ताडे नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याच्या आहेत. त्या माजी नगराध्यक्ष होत्या. फॅनला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं जातंय. साडी गुंडाळलेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडला. अनुसूचित जातीतून नगराध्यक्षपदी श्यामला ताडे या श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये अडीच वर्ष नगराध्यक्ष पदावर होत्या. त्या अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आल्या होत्या. त्यांनी याआधीही याच मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. संबंधित घटना श्रीगोंदामधील धनश्री अपार्टमेंटमध्ये घडली. या इमारतीत त्यांची सदनिका होती. सध्या त्या याच ठिकाणी वास्तव्यास होत्या.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.