शिरूर (वृत्तसंस्था) रांजणगाव औद्योगीक वसाहतीतील शिक्रापुर परिसरात तृतीयपंथी व्यक्तीचा अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करुन निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, रांजणगाव औद्योगीक वसाहत परिसरातील शिक्रापुर येथील मोकळ्या माळरानावर तृतीयपंथी व्यक्तीची निर्घृण हत्या केली. अनिश यादव असे हत्या झालेल्या तृतीयपंथी व्यक्तीचे नाव असून हत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, औद्योगीक क्षेत्रात तृतीयपंथी व्यक्तीची निर्घृण हत्या झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. शिक्रापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस याबाबतचा पुढील तपास करत आहे.