लातूर (वृत्तसंस्था) जेवणासाठी बिर्याणी बनवली नाही म्हणून माथेफिरु तरुणाने पत्नीवर चाकूने वार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुजा विक्रम देडे या महिलेचा पती विक्रम विनायक देडे हा रात्री 10 वाजण्याच्या सुमारास दारु पिऊन घरी आला होता. जेवायला वाढल्यानंतर जेवणासाठी बिर्याणी का बनवली नाही?, असे म्हणून त्याने पत्नीसोबत वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर हॉटेलमधून बिर्याणी आणून दे असा तगादा लावला. पत्नी, आई आणि इतर नातेवाईकांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला परंतू तो कोणाचेच काही ऐकत नव्हता. यानंतर त्याने पत्नीला लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि त्याच्या जवळ असलेला चाकू काढून थेट तिच्या डोक्याच्या डाव्या बाजूस वार केला. यात पत्नी गंभीर जखमी झाली. उपचारासाठी तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी दिलेल्या जबाबावरुन पोलिसांनी विक्रम विनायक देडे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आल आहे.