जामनेर (प्रतिनिधी) कोट्यवधी रूपयांच्या प्रॉपर्टी आमदार गिरीश महाजन यांनी संबंधीत नातेवाईक जवळचे कार्यकर्ते यांचे नावे घेतली आहे. तसेच जामनेर शहरातील ७ प्रॉपर्टीचा कर्ताकरविता धनी आमदार गिरीश महाजन असल्याचा गंभीर आरोप माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी केला. त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेतून आरोप केला असून या सर्व प्रॉपर्टीचा शासनाने जाहीर लिलाव करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की आमदार गिरीश महाजन हे बद्दलची ठेवीदाराबद्दल पुळका दाखवत असून सभासदांच्या डोळ्यात धूळफेक करीत आहेत. साडेतीन वर्षांपूर्वी जामनेर शहरातील पंचवीस कोटी रुपयांची गावालगत असलेली प्रॉपर्टी त्यांच्याच भनसाली नामक कार्यकर्त्याने साडेतीन वर्षांपूर्वी एक कोटी ४० लाख रुपयेत घेऊन हीच प्रॉपर्टी आमदार महाजन यांनी एक कोटी ५७ लाख रुपयात दोन महिन्यापूर्वी खरेदी केली. साडेतीन वर्षात एक कोटी चाळीस लाखाचे व्याज ७० लाख रुपये होते. असे असताना इतक्या कमी मातीमोल भावात ही प्रॉपर्टी त्यांनी खरेदी करून दिलीच कशी ही असा प्रश्न उपस्थित करून ललवाणी म्हणाले की ही जनतेच्या डोळ्यात धूळफेक असून ठेवीदारांचे सुद्धा फसवणूक होत आहे. भंसाली हा कुणाचा कार्यकर्ता आहे? आमदार महाजन मंत्री असताना बनसालिहा सतत त्यांच्या भोवती असायचा याचा अर्थ या सर्व प्रॉपर्टी यांचा कर्ता-करविता आमदार गिरीश महाजन असून त्यांनी कार्यकर्त्यांच्या व जवळच्या संबंधित लोकांच्या नावे या सर्व प्रॉपर्टी खरेदी केल्या असून शासनाने या सर्व प्रॉपर्टी लिलावात काढाव्या. आमदार महाजन यांनी एक कोटी ५७ लाख रुपये घेतलेली ही प्रॉपर्टी मी पंधरा कोटीत घेण्यास तयार असून यासंबंधी मी कोर्टामध्ये एफिडेविट करून द्यायला तयार असल्याचेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की बीएचआरच्या ठेवीदारांचे सातशे कोटी रुपये देणे असून या सर्व प्रॉपर्टी लिलावात काढल्यास हजार कोटी रुपये येतील व सर्व ठेवीदारांचे पैसे दिले जातील.
याबाबत मी शासनाकडे व आमचे नेते अजितदादा पवार शरदचंद्रजी पवार तसेच एकनाथराव खडसे यांच्याकडे यासंदर्भात मागणीचा पाठपुरावा केला. तसेच शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे. ज्यांच्या ज्यांच्या कडे बीएचआर च्या प्रॉपर्टी आहेत अशा सर्वांच्या घरावर २६ जानेवारी रोजी सर्व ठेवीदारांचा मोर्चा नेणार असल्याचेही ललवाणी यांनी सांगितले.