मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील पोलिसांना १० मिनिटांसाठी बाजूला केले तर अकबरुद्दीन ओवेसी यांना औरंगजेबाकडेच पाठवू. अन्यथा आम्ही स्वत:ला शिवरायांचे मावळे म्हणवून घेणार नाही, असे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केले आहे.
एमआयएमचे तेलंगणातील आमदार अकबरुद्दीन औवेसी (Akbaruddin Owaisi) हे औरंगाबादच्या दौऱ्यावर असून त्यांनी खुल्ताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतलं. औरंगाजेबच्या कबरीवर एमआयएमच्या नेत्यांनी माथी टेकवल्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी याबद्दल ट्वीट करत ओवैसीला इशारा दिला आहे. “मी आव्हान करतो, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा.. याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर..आम्ही शिवरायांचे मावळे नाही!!!” असं ट्वीट करत त्यांनी इशारा केला आहे.
नितेश राणेंच्या दुसऱ्या ट्विटमध्ये असं म्हटलंय की, “या कारट्या ओवैसीला माहिती आहे का? की, मी औरंगजेबाच्या थडग्या समोर नागडा नाचलो तरी, मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल.. कारण राज्यामध्ये “नामर्दांचे सरकार आहे”…” असं म्हणत त्यांनी सरकारवरही टीकास्त्र सोडलं आहे. त्याबरोबर शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीही ओवैसी यांच्यावर टीका केली आहे.